ETV Bharat / state

बस तोडफोडप्रकरणी एमआयएमच्या तालुकाध्यक्षासह ११ जणांवर गुन्हा - aurangabad Crime news

बस मंगळवारी फोडल्याप्रकरणी एमआयएमच्या तालुकाध्यक्षासह ११ जणांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

MIM
MIM
author img

By

Published : Jan 19, 2021, 9:41 PM IST

औरंगाबाद - वैजापूर येथे संभाजीनगर असा फलक असलेली बस मंगळवारी फोडल्याप्रकरणी एमआयएमच्या तालुकाध्यक्षासह ११ जणांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

दगडफेक करत काचा फोडल्या

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मंगळवारी (ता. १८) चालक पवार यांनी चाळीसगाव येथून बस क्रमांक (एमएच २० १८ २९) ही शिरूर मार्गे वैजापूरला आणली. दरम्यान पवार यांनी नेहमीप्रमाणे बस स्थानकात नोंद केल्यावर बस आगारात उभी केली. या बसवर छत्रपती संभाजीनगर असा फलक लावलेला होता. दुपारी पावणे तीनच्या सुमारास अचानक काही युवकांनी दगडफेक करत बसच्या समोरील काचा फोडल्या.

पाच जणांना अटक

संभाजीनगर नावाचा फलक असलेली उभी बस फोडल्याप्रकरणी एमआयएमच्या तालुका अध्यक्षासह ११ जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल कुरेशी असे एमआयएम तालुकाध्यक्षाचे नाव आहे. तर शेख कलीम शेख अब्दुल, शेख अरबाज, जुनेद सय्यद जमील सय्यद, शेख राजू शेख मजीद अशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.