औरंगाबाद - गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या स्वागताला घरावर गुढी उभारत आनंद व्यक्त केला जातो. मात्र कोरोनामुळे अनेक निर्बंध आले आहेत. नागरिकांना आवाहन करूनही अनेक जण मास्क घालत नाहीत किंवा शासनाच्या नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी औरंगाबादच्या कोरडे कुटुंबीयांनी मास्क लावलेली गुढी उभारली आहे.
यासाठी जनजागृती
कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने अनेक निर्बंध लावलेले असताना अनेक नागरिक बेजाबाबदारपणे वागत आहेत. मास्क वापरत नाही, सोशल डिस्टन्सचे पालन करत नाही. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनीच काळजी घेण्याचे आवाहन करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सिडको भागात राहणाऱ्या विलास आणि अलका कोरडे या दांपत्याने यावर्षी कोरोना बचाव करणारी सुरक्षा गुढी उभारण्याचा निर्णय घेतला. जवळपास 25 फुटी गुढी तयार करून त्यावर मास्क घातला. गुढीच्या आजूबाजूला मास्क बाबत जनजागृती करणारे फलक त्यांनी लावले. कोरोनाचा विषाणू तयार करून त्यावर एक मास्क घालत आजारापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे हाच पर्याय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हेही वाचा-तुमच्या लाडक्या सेलिब्रेटींचा गुढीपाडवा