औरंगाबाद - आपल्या आजुबाजूला घडणारं सगळ काही थरकाप उडवणारं आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री उशिरा अंग टाकण्यापर्यंत सतत कोरोनामुळे अमूक गेला, इतक्या जणांचे बळी असेच शब्द कानी पडत आहे. मृत्यूचं असं तांडव सुरू आहे, जणू जगात दुसरं काही घडतचं नाही. औरंगाबादमध्येही स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे.
दुपारपर्यंत एकाच स्मशानभूमीत नऊ अंत्यविधी
औरंगाबादसह मराठवाड्यात कोरोना बधित मृतांची संख्या रोजच वाढत आहे. बीड जिल्ह्यात एकाच चितेवर आठ जणांचा अंत्यविधी करण्याची वेळ आली होती. मात्र, सर्वच ठिकाणी अशीच स्थिती ओढवत असल्याच दिसून येत आहे. औरंगाबादच्या सिडको एन 12 स्मशानभूमीत अवघ्या काही तासांमध्ये नऊ मृतदेहांवर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन शेड आहेत. अंत्यविधी झाले असल्याने जागे अभावी मोकळ्या मैदानात कोरोना बाधित सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. एकाच वेळी नऊ मृतदेहांच्या चिता पेटत असल्याच भयावह चित्र गुरुवारी दुपारी पाहायला मिळाले.
मृतांच्या संकेत होत आहेत वाढ
कोरोना बाधितांच्या संख्येत रोजच वाढ होत असून मृतांची संख्या देखील वाढत आहे. मार्च महिन्यात 435 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. तर 1 एप्रिल ते 7 एप्रिल या काळात 203 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. निश्चितच मृतांची संख्या चिंतेचा विषय झाला असून नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची वेळ आली आहे.
मसणजोगीनां येतोय भीतीदायक अनुभव
एन 12 येथील मसणजोगी लक्ष्मण गायकवाड यांनी त्यांना येणार धक्कादायक अनुभव सांगितला आहे. आधी रोज तीन ते चार मृतदेह अंत्यविधीसाठी येत होते. मात्र, आता सकाळी सात पासून ते रात्री बारा पर्यंत 15 ते 20 मृतदेहांवर अंत्यविधी करावा लागत आहे. कुटूंबातील सर्वच सदस्य अंत्यविधी करण्याच्या कामात व्यस्त झाली आहेत. रोज कोरोना बाधित मृतांचे अंत्यविधी करताना सतत भीती वाटत असते. असा अनुभव लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- "लसीकरण करा, तब्बल पाच लाख मिळवा," वर्धा जिल्ह्यात अभिनव योजना