ETV Bharat / state

AIMIM Oppose Renaming : नामांतर विरोधी आंदोलनात झळकला औरंगजेबाचा फोटो; आंदोलन चिघळण्याची शक्यता - Controversy due to the posting of Aurangzeb photo

नामांतराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो दाखवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे वातावरण बिघडणार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी कोणीतरी खोडसाळपणे त्या व्यक्तीला आंदोलनात पाठवल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

Aurangzeb photo
Aurangzeb photo
author img

By

Published : Mar 4, 2023, 8:43 PM IST

Updated : Mar 4, 2023, 9:06 PM IST

एआयएमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो

छत्रपती संभाजीनगर : (औरंगाबाद) नामांतनाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे. यामुळे वातावरण खराब होईल असा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर कोणीतरी खोडसाळपणे आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी त्या व्यक्तीला पाठवलं असा स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी केल आहे.

औरंगजेबाचा फोटो लावल्याने वाद : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एक आठवड्यानी एआयएमआयएम पक्षाने नामांतर विरोधी आंदोलनाला सुरुवात केली. खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आंदोलनात दुपारच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी राजा औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील सुरू असलेला आंदोलन वेगळ्या चर्चेत आले. अत्याचारकारी राजाचा फोटो घेऊन काय सिद्ध करत आहे अशी टीका सोशल मीडियावर व्हायला सुरुवात झाली. मात्र, त्यावर खासदार जलील यांनी स्पष्टीकरण देत कोणीतरी खोडसाळपणे आंदोलनात हातात फोटो घेऊन युवकाला पाठवल्याचा आरोप केला आहे. आंदोलनाचा मोठा परिणाम झाला असता म्हणून, मुद्दामून कोणीतरी कृत्य केले असावे असे खासदार जलील म्हणाले. मात्र, आमच्या लक्षात ही बाब आल्यावर, आम्ही त्या युवकाला आंदोलनातून बाहेर काढले असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

ठाकरे गटाने केली टीका : शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पारित केला. त्यानंतर या सरकारने त्याला छत्रपती संभाजीनगर असे घोषित करून नाव केले. आता या नावाला विरोध कशाला करता, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन काय साध्य करत आहात? तुम्हाला वातावरण खराब करायचे का? असा प्रश्न खैरे यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजी महाराजाच्या नावाला जर एआयएमआयएमने विरोध केला तर, तशाच्या तसे उत्तर देण्यात येईल अशा ईशारा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना दिला.

हेही वाचा - Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कांद्याला मिळणार 'इतके' अनुदान

Last Updated : Mar 4, 2023, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.