औरंगाबाद - रशिया आणि युक्रेन युद्धाचे परिणाम ( Impact Of Russia-Ukeraine War ) दिसून येत आहेत. इंधनाचे दर वाढत असताना दुसरीकडे बांधकाम साहित्य देखील ( Construction Expensive ) महागले आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असून बांधकामाचे दर वाढवून देण्यासाठी कंत्राटदार व्यावसायिक 1 एप्रिलपासून आंदोलन ( Contractor Agitation ) करणार आहेत.
बांधकाम साहित्य दर वाढले - वर्षभर तेजीत असणारा बांधकाम व्यवसाय मंदीच्या लाटेत येण्याच्या वाटेवर आहे. कारण बांधकाम साहित्य दर वाढल्याने कंत्राटदार व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. लोखंड, लाकडी बल्या, सिमेंट, यांच्या दर जवळपास 40 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे जुन्या दरांमध्ये घेतलेले काम पूर्ण करणे तोट्याचे ठरणार आहे. त्यामुळे बिल्डर व्यावसायिकांनी कामाचे दर वाढवून द्यावे, अशी मागणी करत 1 एप्रिलपासून औरंगाबाद बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
या आहेत मागण्या - कुशल आणि अकुशल कामगारांच्या तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या सेंट्रींग मटेरियलच्या वाढलेल्या किमतीमुळे बांधकामाचे दर वाढवणे, सद्यस्थितीत चालू असलेल्या कामांमध्ये यापुढील उर्वरित कामाचे दर 25 टक्क्यांनी वाढवणे, संघटनेने ठरवलेल्या नवीन दर पत्रकाप्रमाणे नवीन कामाचे दर मिळावेत. तरी सर्व व्यावसायिकांनी आणि सर्वसामान्य याबाबत विचार करून दर वाढवून द्यावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
असे असतील दर - पार्किंग 4 ते 7 - 300 रुपये चौरस फूट, पार्किंग 8 ते 9 - 325 रुपये चौरस फूट, पार्किंग 10 ते 11 - 340 रुपये चौरस फूट, पार्किंग 12 ते 14 - 360 रुपये चौरस फूट, पार्किंग 15 ते 17 - 380 रुपये चौरस फूट, पार्किंग 18 ते 21 - 400 रुपये चौरस फूट, रो हाऊस G+1 - 350 रुपये चौरस फूट, रो हाऊस G+2 - 325 रुपये चौरस फूट, वयक्तिक बंगला - 400 रुपये चौरस फूट.
हेही वाचा - Rana's Complaint In Lok Sabha : चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस