ETV Bharat / state

औरंगाबाद : पाडेगाव भागात शॉक लागल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

author img

By

Published : May 15, 2021, 1:36 AM IST

बांधकामाच्या ठिकाणी भींतीचे प्लास्टर करताना वीजेचा धक्का लागल्याने मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Construction worker dies due to shock in Padegaon
औरंगाबाद : पाडेगाव भागात शॉक लागल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

औरंगाबाद - पाडेगाव भागात एका बांधकामाच्या ठिकाणी भींतीचे प्लास्टर करताना वीजेचा धक्का लागल्याने मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश शिवाजी झिलमेवाड (४०) रा. देवळाई रोड, सातारा, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्लास्टरचे काम करताना लागला वायरचा शॉक -

गणेश हे पडेगावातील मीरानगर भागात एका घराचे काम मिळाले होते. गणेश हे घराच्या दुसऱ्या मजल्यावर प्लास्टरचे काम करत होते. त्यावेळी डाव्या हाताला एका वायरचा शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

हेही वाचा - जे जे रूग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील 900 कामगार सोमवारपासून जाणार संपावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.