ETV Bharat / state

महाशिवआघाडीचे सरकार दोन वर्ष टिकेल, काँग्रेस नेत्याचे भाकित - विधानसभा निवडणुक २०१९

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची अवस्था वाईट होती. पुढील काही वर्षे विरोधात बसण्याची त्यांची मानसिकता होती. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी स्थापन केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याचेही पाटील यांनी सांगितलं.

महाशिवआघाडीचे सरकार दोन वर्ष टिकेल, काँग्रेस नेत्याचे भाकित
author img

By

Published : Nov 18, 2019, 4:45 PM IST

औरंगाबाद - राज्यात उदयास येणारे नवीन सत्तासमीकरण अवघे दोन वर्षे टिकेल, असे भाकीत काँग्रेसचे माजी खासदार विजय नवल पाटील यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. राज्यात युतीला जनादेश असून देखील इतर पक्षांनी सत्तेसाठीचा आटापिटा सुरू केला असल्याचा आरोप देखील विजय पाटील यांनी केला.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची अवस्था वाईट होती. पुढील काही वर्षे विरोधात बसण्याची त्यांची मानसिकता होती. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी स्थापन केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याचेही पाटील यांनी सांगितलं.

काँग्रेसचे माजी खासदार विजय पाटील बोलताना...

राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्याच्या विचारात असणारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा वेगळी आहे. तीन टोकाचे तीन लोक सोबत आणायला अवघड जाते. त्यामुळे सत्ता स्थापन करायला वेळ लागत आहे. हे तीन वेगळ्या विचारधारेचे पक्ष सोबत आले तर सरकार स्थापन होईल. मात्र हे सरकार दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चालणार नाही. हे मी अनुभवावरून सांगतो असेही पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभा निवडणूकीत भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी त्याला शिवसेनेकडून साथ न मिळाल्याने, त्यांनी सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेलाही राज्यपालांनी दिलेल्या वेळत सत्ता स्थापन करता आली नाही. यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली.

हेही वाचा - आता औरंगाबादेतून बंगळूरू, दिल्ली विमानसेवा; खासदार दानवेंची माहिती

हेही वाचा - नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शिवशाही बस आणि कारचा अपघात

Intro:राज्यात उदयास येणार नवीन सत्तासमिकरण अवघे दोन वर्षे टिकलं अस भाकीत काँग्रेसचे माजी खासदार विजय नवल पाटील यांनी औरंगाबादेत केलं. राज्यात युतीला जनादेश असून देखील फक्त सत्तेसाठीच आटापिटा सुरू असल्याचा आरोप विजय नवल पाटील यांनी केला.Body:राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची अवस्था वाईट होती. पुढील काही वर्षे विरोधात बसण्याची त्यांची मानसिकता होती. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी स्थापन केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सलाईन मिळणार असल्याचं काँग्रेसचे माजी खासदार विजय नवल पाटील यांनी सांगितलं. Conclusion:राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्याच्या विचारात असणारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा वेगळी आहे. तीन टोकाचे तीन लोक सोबत आणायला अवघड जात. त्यामुळे सत्ता स्थापन करायला वेळ लागत आहे. हे तीन वेगळ्या विचार धारेचे पक्ष सोबत आले तर सरकार स्थापन होईल मात्र ही सरकार दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चालणार नाही असं अनुभवावरून सांगतो अस काँग्रेसचे माजी खासदार विजय नवल पाटील यांनी सांगितलं. या आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिवंत राहणार असून राज्यात जे काही सुरू आहे ते फक्त आणि फक्त सत्तेसाठीच सुरू असल्याच देखील विजय नवल पाटील यांनी सांगितलं.
Byte - विजय नवल पाटील - काँग्रेस, माजी खासदार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.