औरंगाबाद - आपले पैसे आणि दागिने सुरक्षित राहावे यासाठी सर्वसामान्य माणूस बँकेचा पर्याय निवडतो, मात्र आता बँकेतही आपला ऐवज सुरक्षित नसल्याच औरंगाबादच्या कोटक महिंद्रा बँकेत समोर आले. महिलेने ठेवलेले 32 लाखांचे दागिने आणि विदेशी चलन लॉकरमधून गायब झाले आहेत.
महिलेचे दागिने आणि विदेशी चलन लॉकर मधून गायब - हानी कॉलनी येथील दुरैय्याह अली असगर गीरणीवाला या पती सोबत कामाच्या निमित्ताने विदेशात राहतात. त्यांनी स्वतःचे 31 लाख 97 हजारांचे दागिने आणि 3 हजारांचे विदेशी चलन जालना रस्त्यावरील कोटक महिंद्रा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले. त्याचे भाडे त्या नियमित भरतात. अधूनमधून त्या आपला ऐवज व्यवस्थित आहे, याबाबत खात्री करण्यासाठी बँकेत येत असतात. 9 मे रोजी त्या जेव्हा बँकेत गेल्या त्यावेळी मात्र दागिने आणि विदेशी चलन गायब झाल्याचं त्यांना दिसलं.
बँकेने केले हात वर - दागिने आणि विदेशी चलन लॉकरमध्ये दिसून न आल्याने दुरैय्याह अली असगर गीरणीवाला यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना विचारपूस केली. त्यावेळी तुम्ही लॉकरमध्ये काय ठेवता याबाबत आम्हाला माहिती नसते. लॉकरची चावी तुमच्याकडेच असते. त्यामधून तुम्ही काय काढून नेता किंवा काय ठेऊन जाता याबाबत आम्हाला माहिती नसते. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंबाबत जबाबदारी बँकेची नाही ग्राहकांची असते. असे सांगत बँकेने आपले हात वर केल्याने दुरैय्याह यांनी क्रांती चौक पोलिसात तक्रार दिली.
बँकेने दाखवले सीसीटीव्ही - दुरैय्याह यांनी बँकेत आपले दागिने गायब झाल्याचं सांगितल्यावर बँकेने तुमच्या नातेवाईक फातेमा महंमद गिराणीवाला या एकदा एकट्या, तर दोनदा पती सोबत येऊन गेल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर त्यांना सीसीटीव्ही फुटेज देखील दाखवले. प्रकृती चांगली नसल्याने फातेमा यांच्याकडे चावी दिल्याच दुरैय्याह अली असगर गीरणीवाला यांनी सांगितलं. मात्र, गैरहजेरीत लॉकरमधून दागिने गायब झाल्याने त्यांनी बँक मॅनेजर, लॉकरचे काम पाहणाऱ्या महिला कर्मचारी आणि नातेवाईक फातेमा यांच्यावर पोलिसांकडे संशय व्यक्त केला आहे. या तक्रारी वरून क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी पो.उपनि सि. व्ही. ठुबे यांचेकडे तपास देण्यात आला आहे.
बँकेच्या लॉकरमधून दागिने विदेशी चलन गायब, नातेवाईक महिलेसह बँक विरोधात पोलिसात तक्रार
दागिने आणि विदेशी चलन लॉकरमध्ये दिसून न आल्याने दुरैय्याह अली असगर गीरणीवाला यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना विचारपूस केली. त्यावेळी तुम्ही लॉकरमध्ये काय ठेवता याबाबत आम्हाला माहिती नसते. लॉकरची चावी तुमच्याकडेच असते. त्यामधून तुम्ही काय काढून नेता किंवा काय ठेऊन जाता याबाबत आम्हाला माहिती नसते. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंबाबत जबाबदारी बँकेची नाही ग्राहकांची असते. असे सांगत बँकेने आपले हात वर केल्याने दुरैय्याह यांनी क्रांती चौक पोलिसात तक्रार दिली.