ETV Bharat / state

CM Eknath Shinde: कोणी किती आले तरी मोदी एकटेच पुरेसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टिका - उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज 'शासन आपल्या दारी' या शासकीय योजनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : May 26, 2023, 9:48 PM IST

Updated : May 30, 2023, 12:03 PM IST

सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर: केजरीवाल आले याला भेटले, त्याला भेटले, कोणी कोणाला भेटले तरी आमच शासन जनतेच्या दारात जाऊन भेटते. कोणी कितीही आघाड्या केल्या तरी मोदी एकटेच पुरेसे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शासन आपल्या दारी योजने अंतर्गत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी कन्नड येथे उपस्थिती लावली होती. यावेळी शासनाच्या उपाय योजनेची माहिती सांगितली.

जगात देशाचा मान वाढला: केंद्राची मदत असल्याने समृद्धी सारखे मोठ मोठे प्रकल्प सुरू केले. ज्यांचा फायदा आपल्याला होत आहे. देशाची अर्थव्यवस्था चांगली झाली असून जगभरात देशाचा आदर होत आहे. काल आपण पाहिले ऑस्ट्रेलिया देशातील प्रमुख नतमस्तक झाले, हा आपला गौरव आहे. काही लोक विदेशात जाऊन बदनामी करतात, मात्र आपलं काम बोलत. गरीब गरीब राहिले पाहिजे असे काम याआधीच्या सरकारने केले. असे म्हणत काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्ष टिका केली. 2014 मधे सरकार बदलले आणि नवीन योजना आल्या. गरीबांना दिलासा देण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याने आपल्याला अभिमानाची बाब आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

आपण कोणाच्या दारी जात नाही. आपण जनतेच्या दारी येतो काम करून देतो. घरात बसून नाही तर आम्ही लोकांमधे जाऊन काम करतो, ते लोकांना आवडते - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ही तर पोटदुखी: कमी वेळात चांगले काम केले, त्यावर टीका म्हणजे पोट दुखी आहे. असे अनेक कार्यक्रम इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी केले, त्यावेळी कोणी बोलले नाही. आज केजरीवाल आले ते त्याच्या दारी जात आहेत. मात्र आपण कोणाच्या दारी जात नाही. आपण जनतेच्या दारी येतो काम करून देतो. घरात बसून नाही तर आम्ही लोकांमधे जाऊन काम करतो, ते लोकांना आवडते. लोकांना चहा पाजतो तर त्यावर टीका करतात. महाराष्ट्राची माणस सोन्यासारखी आहेत. त्यांना चहा पाणी देऊ शकत नाही का? मी कालही कार्यकर्ता होतो, आज ही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहील. ही बाळासाहेबांची शिकवण आहे अशी टीका ,उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

हेही वाचा -

  1. Samriddhi Highway शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती
  2. Maharashtra Politics राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी फिल्डींग नेतृत्वाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी
  3. Eknath Shinde ठाण्यातील रस्त्याच्या रखडलेल्या कामांमुळे मुख्यमंत्र्यांचा संताप अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

Last Updated : May 30, 2023, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.