पैठण (औरंगाबाद) - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही गंभीर परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि शालिवाहन बँकेच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही तपासणी शुक्रवारी न. प. च्या वाचनालयात करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी 24 सेवा देत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्न करीत आहेत. आरोग्य यंत्रणेबरोबर नगर पालिका आणि पोलीस प्रशासनही काम करीत आहेत. शासकीय कार्यालयात येणार्या अधिकारी आणि कर्मचारी यांचाही संपर्क एकमेकांशी येत असतो. ते लक्षात घेऊन कर्मचार्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
हेही वाचा - कोरोनाग्रस्त महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म, मातेसह बाळ सुखरूप
पोलीस आणि न. प. चे कर्मचारी, कामगार यांचे तापमान तपासुन आरोग्य विषयी काळजी घेण्याचा सल्ला यावेळी तपासणी केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला. नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या उपस्थितीत न.प.च्या वाचनालयात कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक आबा बरकसेही उपस्थित होते.