औरंगाबाद - कोरोना तपासणी कमी केल्याने शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. मात्र बाधित रुग्ण कमी झाल्याने तपासणी आपोआप कमी झाली आहेत. शहरातील पॉझिटिव्हीटी दर कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.
'शहरात तपासणी कमी नाहीच'
औरंगाबाद शहरात रोज एक हजारांच्या जवळपास नवीन कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे मार्च महिन्यात पहायला मिळाले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रोज तीनशे ते चारशे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या कमी होत आहेत. मात्र मनपाने कोविड तपासणी कमी केल्याने रुग्ण कमी झाल्याचे बोलल्या जात आहे. मात्र मनपाने आरोप फेटाळून लावले आहेत. पूर्वी रोज पाच ते सहा हजार नागरिकांची दररोज चाचणी केली जात होती. त्यावेळी आपला पॉझिटिव्हीटी दर 20 च्या जवळपास गेला होता. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात होती. बाधित रुग्ण कमी झाले असून त्याचा रेट 12 टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे संपर्कातील नागरिक देखील कमी झाल्याने तपासणी आपोआप कमी झाली आहे. त्यात नागरिक देखील काळजी घेत असल्याने रुग्णसंख्या कमी करण्यात मदत मिळाली असल्याची, माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.
शहरात कोरोना तपासणी अधिक प्रमाणात केली जात आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी जवळपास 42 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर दाखल होणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करत आहेत. परिणामी अनेक बाधित शहरात येण्याआधीच निष्पन्न होत आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरात प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव करता येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याची माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली आहे.
हेही वाचा -इथे कोरोनाला कोणीच घाबरत नाही? मालेगावकरांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन