ETV Bharat / state

औरंगाबाद : पैठणच्या ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळेना

लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी किती वाजता ॲपवर जावे याबाबत राज्य सरकारच्या टोल फ्री नंबरवर कॉल केला असता, त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत ग्रामीण नागरिकांना अपुरी माहिती असल्याकारणाने तालुक्यासाठी आलेले लस हे शहरी भागातल्या लोकांनी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळेना
ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळेना
author img

By

Published : May 16, 2021, 10:58 PM IST

पैठण (औरंगाबाद) - एक मेपासून देशभरात 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाली असून पैठण तालुक्यात सहा मेपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. लस रजिस्ट्रेशन शिवाय घेता येत नाही आणि ऑनलाइन रजिस्ट्रेशनवर शहरी भागातल्या लोकांनी डल्ला मारल्याने ग्रामीण भागातले गरजू नागरिक वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळेना

ॲपवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे
18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना शासन निर्णयप्रमाणे ॲपवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही लस कुठे आणि कोणत्या तारखेला घेणार आहात याचा तपशील द्यावा लागतो. मात्र हे करण्यात ग्रामीण भागातले नागरिक कमी पडत असून शहरी भागातले नागरिक इंटरनेट आणि सॉफ्टवेअर वापरण्यात पारंगत असल्याकारणाने ॲपवर ग्रामीण भागाची निवड करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुकास्तरावरील नागरिक या लसीपासून वंचित राहत आहेत. 6 मे आणि 7 मे रोजी पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात 400 लसींपैकी तीनशे ते साडेतीनशे लसी शहरी भागातल्या लोकांनी घेतल्याची माहिती आहे.

लसीकरण सुरळीत करण्याची मागणी
लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी किती वाजता ॲपवर जावे याबाबत राज्य सरकारच्या टोल फ्री नंबरवर कॉल केला असता, त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत ग्रामीण नागरिकांना अपुरी माहिती असल्याकारणाने तालुक्यासाठी आलेले लस हे शहरी भागातल्या लोकांनी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीड, अशा जिल्ह्यातून नागरिकांनी पैठणच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन आपले लसीकरण केले आहे. त्यामुळे या ॲपवरील त्रुटी त्वरित दुरुस्त करून लसीकरण सुरळीत करावे, अशी मागणी पैठण तालुक्याचे नागरिक करत आहे.

हेही वाचा - सावळागोंधळ! पश्चिम बंगालमध्ये मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.