छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यातील शाब्दिक चकमक काही थांबायला तयार नाही. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खैरे भाषण सुरू होण्याआधीच पालकमंत्री घटनाबाह्य आहेत, असे म्हणत निघून गेले. त्यावर खैरे यांना लोकशाही कळलीच नाही, त्यांनी ती मान्य केली पाहिजे. कोणताही पालकमंत्री असो त्याचा संदेश ऐकला पाहिजे, आमची सत्ता आल्याचे त्यांना पचले नाही, अशी टोलेबाजी भुमरे यांनी केली.
या आधी खैरे निघून गेले होते : राज्यात शिवसेनेच्या आमदारांनी उठाव करत सत्ता बदल घडवून आणला. मात्र त्यानंतर शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. या निमित्ताने शहरात मोठा राजकीय बदल दिसून आला. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आणि तेव्हापासून भुमरे आणि खैरे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाले. या आधी 26 जानेवारीच्या झेंडावंदन कार्यक्रमात भुमरे नागरिकांना संदेश देण्याआधीच खैरे तिथून निघून गेले होते. त्यानंतर अनेक वेळा हे दोन्ही नेते आमने - सामने आले मात्र तेव्हाही त्यांच्याच शाब्दिक वाद दिसून आला. त्याचा प्रत्यय आजही 1 मे च्या ध्वजारोहण कार्यक्रमात दिसून आला. संदिपान भुमरे यांचे भाषण सुरू होण्याआधीच खैरे तिथून निघून गेले. ते घटनाबाह्य पालकमंत्री आहेत, त्यांचं काय ऐकायचं अशी टीका त्यांनी केली. त्यावर भुमरे यांनी देखील प्रत्युतर देत, यांना घटना मान्य नाही. पालकमंत्री कोणी असो त्यांचा संदेश ऐकून जायला पाहिजे. मात्र यांना आम्ही सत्तेत आल्याचे पचले नाही, अशी टीका खैरेंवर केली.
'मतदारांनी नाकारले' : संदीपान भुमरे पुढे म्हणाले की, जिल्ह्याने मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये वज्रमुठ दाखवून दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मविकास आघाडीची एक मार्केट कमटी आल्याचे दाखवून द्यावी. आज पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आहे, तो सुद्धा महायुतीकडे येईल. महाविकास आघाडीची वज्रमुठ विधानसभेपर्यंत टिकणार नाही. अजित दादांना विचारलं पाहिजे तुम्ही कुठे आहे? तुम्हाला वज्रमठ सभेत महत्त्व आहे की नाही? महाविकास आघाडीत एक दिवस याचा स्फोट होणार आहे. ठाकरे आणि महाविकास आघाडीला या ठिकाणच्या जनतेने बाजार समितीच्या निवडणुकीत नाकारले आहे. ठाकरेंना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यामध्ये बैठक घेण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. ही रास्त मागणी असून बैठक घेण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहे असल्याच पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
हेही वाचा : Sanjay Shirsat On Ajit Pawar: अजित पवार लवकरच निर्णय घेणार- शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांचा दावा