छत्रपती संभाजीनगर: तरुणीसोबत भर रस्त्यात झटपट करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. शहरातील बेगमपुरा परिसरामध्ये एक मुस्लिम तरुणी इतर धर्मीय तरुणांसोबत फिरत असल्याची शंका काही तरुणांना आली, त्यानंतर या तरुणी तरुणीला रस्त्यामध्ये अडवून या तरुणांनी चांगलीच झटापट घालतानाचे हा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तरुणी या तरुणांना मला जाऊ द्या अशी विनवणी करत आहे, मात्र तरी देखील तरुण तिच्या हातातील मोबाईल हिसकवत आहे. विशेष म्हणजे या संबंधी तरुणीकडून किंवा तिच्या परिवाराकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली गेली नाही. मात्र पोलीस आता स्वतः गुन्हा दाखल करून घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेगमपुरा भागात फिरत होती युवती: व्हिडिओत असलेली युवती बेगमपुरा भागात आपल्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी आली होती. ती त्याला भेटून जात असताना काही युवकांनी तिला अडवत त्रास द्यायला सुरुवात केली. ती वारंवार मला जाऊ द्या अशी विनंती करू लागली, मात्र या युवकांनी तिला त्रास देणे सोडले नाही. हातातला मोबाईल, पाठीवर असलेली बॅग ओढत ते तिला त्रास देऊ लागले. हा प्रकार भर दुपारी मध्य रस्त्यात झाला आहे. मात्र यांना कोणीही अडवले नाही, इतकच नाही तर काहीजण या सर्व घटनेचा व्हिडिओ तयार करत होते. तू त्या मुलाला का भेटलीस? कुठून आलीस? अशा पद्धतीने तिला टोमणे देत तिचा छळ त्यांनी केला. युवती रडत होती, मात्र त्याचा युवकांवर काहीही परिणाम झाला नाही. ही घटना दोन दिवसांनी आधी शहरात घडली त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
पोलीस तक्रार देण्यास नकार: व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्याने, बेगमपुरा पोलिसांनी तातडीने या व्हिडिओची दखल घेत मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचा तपास केला. त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून लेखी तक्रार देण्याच्या सूचना केल्या, मात्र आम्हाला याप्रकरणी कुठलीही तक्रार द्यायची नाही, आमची तक्रार नाही अशा पद्धतीचे उत्तर कुटुंबीयांनी आणि मुलीने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोन दिवस या प्रकरणाची तक्रार देण्याची वाट पाहिली. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्या जात असल्याने अखेर, पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात गुन्हा दाखल केला. इतकच नाही तर व्हिडिओ दिसणाऱ्या युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र आजच्या शिक्षित युवकांमध्ये आजही संस्कृतीचा अभाव आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: Murder पैशाच्या देवाणघेवाणवरून वाद ५५ वर्षीय महिलेचा खून