औरंगाबाद - मटण घेतलेले पैसे मागीतल्यानंतर ग्राहकाने दुकानदाराला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शहरातील औरंगपुरा भागात बारुदगर नाला येथे घडली. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फैजान अहमेद कुरेशी (वय 22 वर्षे, रा. शहाबाजार) यांचे मटण दुकान आहे. अरबाज हा मटण घेण्यासाठी मंगळवारी (दि. 30 मार्च) गेला. यावेळी फैजान याने मटण घेऊन गेल्याचे मागील पैसे मागितले. यावेळी अरबाज याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी आणखी दोघांना बोलावत लठ्या काठ्यांनी फैजानला मारहाण केली. यावेळी फैजान हा गंभीर जखमी झाला. यावेळी आरोपी पसार झाले.
याप्रकरणी फैजनाने दिलेल्या तक्रारीवरून अरबाज खान फिरोज खान (वय 25 वर्षे), फरान खान फिरोज खान (वय 25 वर्षे), फिरोज खान (वय 45 वर्षे, रा. सर्व बारुदगरनाला) या तिघांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण