ETV Bharat / state

कन्नडमध्ये किराणामालाच्या दुकानाला आग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - fire in kannad tehsil

कन्नड तालुक्यातील जेहूर बस स्टँडजवळ रात्री 10 वाजता अज्ञात व्यक्तीने टायर पेटवून दिल्याने नजिकच्या किराणामाल दुकानास आग लागली. संबंधित दुकान निलेश संजय पवार यांचे असून आगीमुळे गोडेतेलाने पेट घेतला.

fire in aurangabad
कन्नडमध्ये किराणामालाच्या दुकानाला आग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 16, 2020, 3:22 PM IST

Updated : Apr 16, 2020, 4:25 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील जेहूर बस स्टँडजवळ रात्री 10 वाजता अज्ञात व्यक्तीने टायर पेटवून दिल्याने नजीकच्या किराणामाल दुकानास आग लागली. संबंधित दुकान निलेश संजय पवार यांचे असून आगीमुळे गोडेतेलाने पेट घेतला. यामुळे फ्रिज, साखर पोते, शेगादाण्याच्या गोणी असा मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झालाय.

कन्नडमध्ये किराणामालाच्या दुकानाला आग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित तरुणांनी प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण माल बेचिराख झाला होता. सकाळी अकरा वाजता अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेहूर सजाचे तलाठी राम दूधभाते यांनी संबंधित प्रकरणाचा पंचनामा केला असून पुढील तपास देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँस्टेबल सुदाम साबळे करत आहेत.

Last Updated : Apr 16, 2020, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.