ETV Bharat / state

हुंडा नको मामा फक्त... 21 नखी कासव, ब्लॅक डॉगी अन् 10 लाख द्या मला; मग काय लग्नही मोडलं, गुन्हाही दाखल

author img

By

Published : Jul 26, 2021, 8:11 AM IST

Updated : Jul 26, 2021, 8:22 AM IST

कायदा होऊनही हुंडा मागण्याचा प्रकार बंद झालेला दिसत नाही. औरंगाबाद येथील चराटे कुटुंबियांनी लग्नापूर्वीच 10 लाख रुपये, 21 नखी कासव आणि लॅब्राडोर कुत्र्याची मागणी केली. या मागण्या मुलीच्या पालकांनी अमान्य केला. त्यामुळे वधू-वर कुटुंबियात खटके उडाले. अखेर मुलीने लग्न करण्यास नकार दिला आणि लग्न मोडले. शिवाय, हुंडा मागितल्याप्रकरणी मुलाच्या कुटुंबियांवर गुन्हाही दाकल केला.

aurangabad
aurangabad

औरंगाबाद - लग्नात हुंडा मागणे आणि तो देणे असे प्रकार आजही सर्रास सुरू आहेत. त्यात सोने, वाहन, घर मागण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. मात्र, लग्नाच्या आधीच 10 लाख रुपायांसह हुंड्यात 21 नखी कासव आणि लॅब्राडोर कुत्रा मागितल्याचा प्रकार रमानगर भागात समोर आला आहे. या प्रकरणी उस्मानापुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलगा आकाश सैन्यात कार्यरत आहे. तर त्याची बहिण क्राईम शोमध्ये कलाकार म्हणून काम करत असल्याचं समोर आलं आहे.

साधना आढाव - पोलीस उपनिरीक्षक

साखरपुडा होताच वाढली मागणी

रमानगर येथील अनिल सदाशिवे यांच्या मुलीचा विवाह सैन्य दलात कार्यरत असलेल्या नाशिक येथील रहिवासी असलेल्या आकाश चराटे याच्याशी निश्चित झाला. फेब्रुवारी 2021 मध्ये मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा पार पडला. त्यावेळी 'आम्हाला काही नको जे तुम्हाला हवं असेल ते द्या' असं चराटे कुटुंबियांनी म्हटले. मात्र, काही दिवसांमध्येच चराटे कुटुंबियांनी मागण्या सुरू केल्या. त्यात त्यांनी 21 नखी कासव आणि काळ्या रंगाचा विदेशी लॅब्राडोर कुत्रा मागितला.

मुलीच्या सुखासाठी कुत्रा देण्याची तयारी

मुलीच्या सुखासाठी अनेक पालक मुलांकडच्या लोकांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती नसताही काही पालक कर्ज घेऊन वराच्या मागण्या पूर्ण करतात. त्याचप्रमाणे सदाशिवे कुटुंबियांनी मुलीच्या आनंदासाठी लॅब्राडोर कुत्रा देण्याचं मान्य केलं. मात्र, कासव कसा आणायचा? असा प्रश्न सदाशिवे कुटुंबियांना पडला. त्यात त्यांना असा कासव आणणे गुन्हा आहे, हे कळल्यावर मात्र त्यांनी मागणी पूर्ण करण्यास नकार दिला.

अखेर मुलीने मोडले लग्न

मात्र, सदाशिवे कुटुंबियांनी कासव देण्यास नकार दिल्याने चराटे कुटुंबिय नाराज झाले. तेव्हापासून दोन्ही कुटुंबियांमध्ये खटके उडायला सुरूवात झाली. अखेर मुलीने विवाह मोडला आणि हुंडा मागणाऱ्या कुटुंबात जायाचं नाही, असा निर्णय घेतला.

नवरा मुलगा करायचा नेहमी वस्तूंची मागणी

सैन्य दलात कार्यरत असलेल्या आकाश चराटे याच्याशी औरंगाबाद येथील युवतीचा विवाह जुळला. साखरपुडा झाल्यावर आकाश युवतीशी बोलताना वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करू लागला. त्यात प्रथम त्याने त्याच्या वाढदिवसाला सोन्याचे ब्रेसलेट मागितले.

सोन्याच्या ब्रेसलेटची मागणी

जावई हा लाडाचा असतो. त्याला नाराज करून चालत नाही. नाहीतर तो नंतर मुलीला त्रास देतो, असा मुलीच्या पालकांना वाटते. मात्र, सदाशिवे कुटुंबियांना परिस्थिती नसल्यामुळे सोन्याचे ब्रेसलेट देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी चांदीचे ब्रेसलेट दिले. त्यानंतर घराच्या वास्तूशांतीला तीन फुटाची बुद्धाची सोन्याची मूर्ती आणि समईची मागणी करण्यात आली. या मागणीमुळे मुलीचे आई वडिल व्यथित झाले.

घरात शांती-समृद्धीसाठी कुत्रा-कासवाची मागणी

21 नखांचे कासव असल्यास घरात सुख-शांती लाभते, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे लग्नाच्या आधी कासव मिळावे, अशी मागणी चराटे कुटुंबियांनी केली. इतकंच नाही तर लॅब्राडोर कुत्रा घरात असल्यावर घरात समृद्धी येते, असे म्हणत कुत्र्याची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे काळी जादू करणे, गुप्तधन शोधणे यासाठी 21 नखी कासवाचा वापर करतात, अस बोललं जातं. त्यामुळे अशा कामांसाठी देखील कासवाची मागणी झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर लॅब्राडोर कुत्रा घरात असला तर प्रतिष्ठा वाढते. त्यामुळे हुंड्यात कुत्रा आणि कासवाची मागणी केल्याचं नाकारता येत नाही.

मुलीला नोकरी लावण्यासाठी 10 लाखांची मागणी

अनिल सदाशिवे यांची मुलगी स्पर्धा परीक्षांची तयारी करते. काही परीक्षांमध्ये ती उत्तीर्ण देखील झाली. मात्र, तिला नोकरी लावण्यासाठी पैसे द्यावे लागतील असं म्हणून नोकरीच्या नावाखाली 10 लाख रुपयांची मागणी चराटे कुटुंबीयांनी केली. लग्नाच्या पूर्वीच पैश्यांची मागणी सुरू झाल्याने सदाशिवे कुटुंबियांनी धोका लक्षात घेतला. त्यानंतर त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेत पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

अखेर उस्मानापुरा पोलिसात गुन्हा दाखल

आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत अनिल सदाशिवे यांनी दोन महिन्यांपूर्वी उस्मानपुरा पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर सदाशिवे यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना याबाबत पत्र लिहिलं. त्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे या प्रकरणाची तपासणी करण्याच्या सूचना केल्या. त्यावरून पोलीस उपायुक्तांनी केलेल्या सूचनेनंतर उस्मानपुरा पोलिसांनी अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. मात्र, गुन्हा दाखल करत असताना हुंडा मागितल्याबाबत नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरात लवकर हुंडा मागितल्याबाबत गुन्हा दाखल करून संपूर्ण कुटुंबावर कारवाई व्हावी, अशी मागणी सदाशिवे कुटुंबीयांनी केली आहे. तर नाशिक येथील रहिवासी असलेल्या चराटे कुटुंबियांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक साधना आढाव यांनी दिली. रविंद्र चराटे, लता चराटे, आकाश चराटे, पूनम चराटे, माधुरी चराटे (सर्व रा. डायमंड कॉलनी, नाशिक रोड) आणि संतोष उमले (रा. बाळापुर, जि. अकोला) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुंडा दिल्याने मुलगी सुखी राहील याचा काय भरोसा?

हुंडा देणे-घेणे चुकीचेच आहे. याला कायद्याचाही आधार आहे. मात्र, या कायद्याबाबत सध्या कोणालाही भीती नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, हुंडा मागण्याची पद्धत बदलल्याचे चित्र दिसत आहे. कारण, थेट हुंडा न मागता अप्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी केली जात आहे. जसे की गाडी, बंगला, सोने-चांदी, वस्तू, शेती. पालकांनी लहानपणापासून आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं. त्यामुळे तिचे संसारीक आयुष्यही सुखी व्हावे. तिला सासरी काही त्रास होऊ नये, अशी सर्वच पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे काहीजण परिस्थिती नसतानाही मुलांकडच्या लोकांच्या भरमसाठा मागण्या मान्य करतात. मजबुरीमुळे मुलीचे पालक त्यासाठी कर्जही काढतात. पण, हा अप्रत्यक्ष हुंडा देऊनही मुलगी सुखी राहते का? या प्रश्नाचे उत्तर अनेक पालकांना मिळाले असेलही. पण, ज्या पालकांच्या मुलीचे लग्न होणार आहे, ते जर अशा मागण्यांना बळी पडत असतील तर त्यांनीही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की "हुंडा दिल्याने मुलगी सुखी राहील याचा काय भरोसा?".

मुलांकडील मागण्या मान्य न केल्याने मुलीला त्रास होण्याची भीती

अनेक पालक मुलाकडील लोकांच्या मागण्या मान्य करतात. आपल्या मुलीच्या सासरच्या लोकांना नाराज करायला नको, असा मुलीच्या पालकांचा विचार असतो. पण, आपल्या मुलीला ते त्रास देणार नाहीत. सासरवास करणार नाहीत, अशी भीतीही मुलीच्या पालकांना असते, याची शक्यता नाकारता येत नाही.

हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१

या अधिनियमातील कलम २ अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या अशी, की 'विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा कबूल केलेली कोणतीही संपत्ती अथवा मूल्यवान रोख-वस्तू'.

हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शिक्षा

  • कलम ३ अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी ५ वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी रुपये १५,००० रुपये अथवा अशा हुंड्याच्या मूल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रक्कमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
  • कलम ४ अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी ६ महिने ते २ वषापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि १०,००० रुपयांपर्यंत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
  • कलम ४ अ अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंड्यासंदर्भात जाहिरात छापल्यास किंवा प्रसिद्ध केल्यास कमीत कमी ६ महिने परंतु ५ वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची किंवा रुपये १५,००० रुपयांपर्यंत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

हुंडा न घेतल्याचा फायदा

हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. पण तरीही हुंडा देण्या-घेण्याची पद्धत बंद झालेली दिसत नाही. हुंडा न घेण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. कारण, लग्नावेळी फक्त नवरा मुलगा मुलीला पाहून पंसत करतो आणि व्यवहाराचं देणं-घेणं तुम्ही बघा, असे पालकांना सांगतो. मात्र, असे न करता नवऱ्यामुलाने स्वतःहून मला हुंडा आणि इतर कोणत्याही वस्तू नको, असे म्हणणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठेतरी हुंड्याची पद्धत बंद होण्यास सुरूवात होईल. शिवाय, हुंडा न घेतल्यास समाजात ताठ मानेने जगता येईल. मुलीसमोर, तिच्या कुटुंबियांसमोर इज्जत वाढेल. नंतर जावयाला चागंला आदर आणि प्रेम मिळेल. इतरांसाठीही एक आदर्श ठराल. तसेच, इतर कुणी हुंडा घेतला तर त्याच्या विरोधात आवाजही उठवता येईल. जर स्वतःच हुंडा घेतला तर हुंडाबळी विरोधात काय बोलणार?

हेही वाचा - KARGIL VIJAY DIWAS जाणून घ्या, 'ऑपरेशन विजय'ची सविस्तर माहिती

Last Updated : Jul 26, 2021, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.