ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू गाडी फोडली - औरंगाबादमध्ये बीएमडब्लू गाडी फोडली

बीएमडब्लू गाडीवर हल्ला करत हल्लेखोरांनी दगड आणि लोखंडी रॉडने  गाडीची तोडफोड केली. या हल्ल्यात कारच्या सर्व काचा फुटल्या. सर्व घटना अचानक घडल्याने कारमधील लोक भयभीत झाले होते. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू गाडी फोडली
author img

By

Published : Nov 22, 2019, 11:38 AM IST

औरंगाबाद - भर रस्त्यात महागडी 'बीएमडब्लू' गाडी फोडल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादच्या जालना रस्त्यावर वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर ही घटना घडली आहे. बीएमडब्लू गाडीच्या काचा फोडत असताना कारमधील दोघांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू गाडी फोडली

हेही वाचा - औरंगाबाद: तीन दिवसीय जागतिक धम्म परिषदेचे आयोजन, दलाई लामा राहणार उपस्थित

बीएमडब्लू गाडीवर हल्ला करत हल्लेखोरांनी दगड आणि लोखंडी रॉडने गाडीची तोडफोड केली. या हल्ल्यात कारच्या सर्व काचा फुटल्या. सर्व घटना अचानक घडल्याने कारमधील लोक भयभीत झाले होते. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. कारमधील पवन सदाशिवे आपल्या मित्रासोबत जालना रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या चार जणांनी सिडको येथील वसंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर गाडी अडवली आणि हल्ला चढवला.

हेही वाचा - कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाचे अपहरण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक अटकेत

हल्ला करून चार जण निघून जात असताना पवन सदाशिवे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी पुन्हा कारवर हल्ला चढवत कारची नासधूस केली. या सर्व प्रकारामुळे गाडीमध्ये असलेले पवन सदाशिवे आणि त्यांचे मित्र भयभीत झाले. पवन यांच्या मित्राने हल्लेखोरांची ओळख पटावी याकरिता त्यांच्या मोबाईलमध्ये या सर्व घटनेचे चित्रीकरण केले. या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी पवन सदाशिवे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Intro:भर रस्त्यात बीएमडब्लू फोडल्याची घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबादच्याया जालना रस्त्यावर वसंतराव नाईक महाविद्यालय समोर ही घटना घडली. बीएमडब्लूच्या काचा फोडत असताना कार मधील दोघांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.
Body:हल्लेखोरांनी दगड आणि लोखंडी रॉडने बीएमडब्लू कार वर हल्ला करत तोडफोड केली. या हल्ल्यात कारच्या सर्व काचा फुटल्या. सर्व घटना अचानक घडल्याने कार मधील भयभीत झाले होते. या प्रकरणी सिडको पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.Conclusion:कार मधील पवन सदाशिवे आपल्या मित्रासोबत जालना रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या चार जणांनी सिडको येथील वसंतराव चव्हाण महाविद्यालय समोर बीएमडब्लू अडवली आणि हल्ला चढवला. हल्ला करून चार जण निघून जात असताना पवन सदाशिवे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी पुन्हा कारवर हल्ला चढवत कारची नासधूस केली. कार मध्ये असलेले पवन सदाशिवे आणि त्यांचे मित्र भयभीत झाले. पवन यांच्या मित्राने हल्लेखोरांनी ओळख पटावी याकरिता त्यांचं मोबाईल चित्रीकरण काढून ठेवलं. या हल्ल्यामागच कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. या प्रकरणी पवन सदाशिवे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.