ETV Bharat / state

औरंगाबादेत मैत्रीपूर्ण लढत घ्या, भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी - BJP

लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप यांनी युतीची घोषणा केली. या युतीने अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत घेण्याची मागणी होत आहे.

भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी
author img

By

Published : Feb 23, 2019, 1:44 PM IST

Updated : Feb 23, 2019, 2:18 PM IST

औरंगाबाद - भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी काही ठिकाणच्या जागेवरुन दोन्ही पक्षात धुसफुस असल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्याचे शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत घ्या, अशी मागणी केली आहे. त्यानंतर हीच मागणी आता औरंगाबादमध्येही होताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप यांनी युतीची घोषणा केली. या युतीने अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत घेण्याची मागणी होत आहे.

भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी
भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी

सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतल्यास मैत्रपूर्ण लढत करू अशी मागणी भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केली. युतीची घोषणा झाल्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा देऊ, अशी भाजपची भूमिका होती. मात्र, चंद्रकांत खैरेंनी युती झाली नसती तरी विजयी झालो असतो असे वक्तव्य केले होते. खैरेंचे हे वक्तव्य भाजपच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी आपली भूमिका बदलली. शिवसेना तयार असेल आणि पक्षप्रमुखांची परवानगी असेल तर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे सेना - भाजपमध्ये शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Intro:जालण्याचे शिवसेना आमदार आणि राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत घ्या अशी मागणी केली, त्या नंतर हीच मागणी आता औरंगाबादेत होताना दिसून आली.

Body:लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप यांनी युतीची घोषणा केली. या युतीने अनेक ठिकाणी इच्छुक नाराज झाले असून अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत घेण्याची मागणी होताना दिसून येत आहे.

Conclusion:औरंगाबाद जिल्ह्यात सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिबसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतल्यास मैत्रपूर्ण लढत करू अशी मागणी भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केली. युतीची घोषणा झाल्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा देऊ अशी भुमिका भाजपची होती. मात्र चंद्रकांत खैरे यांनी युती झाली नसती तरी विजयी झालो असतो अस वक्तव्य केले. त्यामुळे भाजपचा जिव्हारी लागल्याने त्यांनी आपली भूमिका बदलली. शिवसेना तयार असेल आणि पक्ष प्रमुख यांची परवानगी असेल तर मैत्री पूर्ण लढत होऊ द्या, मागील एक दिड वर्षांपासून भाजपने प्रत्येक बूथ पर्यंत आपली यंत्रणा तयार केली असून भाजप चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे खासदार तयार असल्यास मैत्रीपूर्ण लढत करू असं भाजपने स्पष्ट केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकी आधी सेना भाजपात चांगलीच शब्दकीक चकमक पाहायला मिळेल यात शंका नाही.
Last Updated : Feb 23, 2019, 2:18 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.