ETV Bharat / state

'संभाजीनगर' नावासाठी भाजप आग्रही, औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांचा गोंधळ - संभाजीनगर वाद

राज्यात युती तुटल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेत असलेली सर्वात जुनी युती भाजपने तोडली. आगामी महानगरपालिका निवडणूक पाहता भाजपने शिवसेनेला लक्ष करायला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांच्या आवडीचे शहर म्हणून असलेल्या शहराला त्यांनी सुचवलेले नाव द्या अशी मागणी करत भाजप शिवसेनेची अडचण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

bjp-wants-aurangabad-renamed-to-sambhaji-nagar
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, भाजपची मागणी
author img

By

Published : Dec 22, 2019, 10:16 AM IST

औरंगाबाद - महानगर पालिकेत भाजपचे नगरसेवक सत्ताधारी शिवसेनेला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. पाणी प्रश्नावर भाजपने सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यानंतर भाजप नगरसेवकांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या अस्मितेच्या प्रश्नावर भाजपने लक्ष केल्याचे दिसून आले.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, भाजपची मागणी

हेही वाचा - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द सरकारने पाळला नाही - चंद्रकांत पाटील

राज्यात युती तुटल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेत असलेली सर्वात जुनी युती भाजपने तोडली. आगामी महानगरपालिका निवडणूक पाहता भाजपने शिवसेनेला लक्ष करायला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांच्या आवडीचे शहर म्हणून असलेल्या शहराला त्यांनी सुचवलेले नाव द्या? अशी मागणी करत भाजप शिवसेनेची अडचण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत मंजूर करून शिवसेनेने काही वर्षांपूर्वी राज्यसरकारला दिला होता. मात्र, राज्यात आणि केंद्रात आघाडी सरकार असल्याने ते शक्य झाले नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेने संभाजीनगरच्या मुद्यावर प्रचार केला. भाजपने देखील त्या मुद्दा मान्य करत शहराचे नाव बदलण्याची मागणी केली. इतकेच नाही तर युतीचे नेते जाहीर कार्यक्रमात शहराला संभाजीनगर या नावानेच उल्लेख करू लागले होते. मात्र, हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता असल्याचे दिसून येत होते. शिवसेनेने हाती घेतलेला मुद्दा मात्र आता भाजपने हेरल्याच दिसून येत आहे. राज्यात शिवसेनेने भाजपसोबत युती तोंडात महाघाडीसोबत सरकार स्थापन केले. भाजपला सर्वाधिक जागा घेऊनही विरोधात बसावे लागले. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 'एकला चलो रे'चा नारा देत शिवसेनेला घेरायला सुरुवात केली आहे. शहरासाठी मंजूर पाणी योजनेला स्थगिती मिळाल्याचा आरोप करत भाजपने महानगरपालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बाजवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी महापौरांना पत्र लिहून राज्यात शिवसेना सरकार असल्याने शहराला संभाजीनगर नाव द्यावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

पाणी योजनेवरून सर्वसाधारण सभेत गदारोळ केल्यावर आता संभाजीनगरचा मुद्दा घेऊन भाजप पुन्हा सभा गाजवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करा, अशी मागणी केल्याचे भाजप गटनेता प्रमोद राठोड यांनी सांगितले तर सेना भाजपला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.

हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी भ्रमनिरास करणारी, सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन - रघुनाथ पाटील

Intro:औरंगाबाद महानगर पालिकेत भाजप शिवसेनेला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसुन आलं. पाणी प्रश्नावर भाजपने सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यानंतर भाजप नगरसेवकांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या अस्मितेच्या प्रश्नावर भाजपने लक्ष केल्याचं दिसून आलं. Body:राज्यात युती तुटल्यानंतर औरंगाबाद महानगर पालिकेत असलेली सर्वात जुनी युती भाजपने तोडली. आगामी महानगर पालिका निवडणूक पाहता भाजपने शिवसेनेला लक्ष करायला सुरुवात केली आहे. बाळासाहेबांच्या आवडीचं शहर म्हणून असलेल्या शहराला त्यांनी सुचवलेल नाव द्या अशी मागणी करत भाजप शिवसेनेची अडचण वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र औरंगाबाद महानगर पालिकेत दिसत आहे.Conclusion:औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव महानगर पालिकेत मंजूर करून शिवसेनेने काही वर्षांपूर्वी राज्यसरकरला दिला होता. मात्र राज्यात आणि केंद्रात आघाडी सरकार असल्याने ते शक्य झालं नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेने संभाजीनगरच्या मुद्द्यावर प्रचार केला. भाजपने देखील त्या मुद्द्याला मान्य करत शहराचं नाव बदलण्याची मागणी केली. इतकंच नाही तर युतीचे नेते जाहीर कार्यक्रमात शहराला संभाजीनगर या नावानेच उल्लेख करू लागले होते. मात्र हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता असल्याचं दिसून येत होत. शिवसेनेने हाती घेतलेला मुद्दा मात्र आता भाजपने हेरल्याच दिसून येत आहे. राज्यात शिवसेनेने भाजपसोबत युती तोंडात महाघाडीसोबत सरकार स्थापन केल. भाजपला सर्वाधिक जागा घेऊनही विरोधात बसावं लागलं. त्यामुळे आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपने ऐकला चलो रे चा नारा देत शिवसेनेला घेरायला सुरुवात केली आहे. शहरासाठी मंजूर पाणी योजनेला स्थगिती मिळाल्याचा आरोप करत भाजपने महानगर पालिकेत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका बाजवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी महापौरांना पत्र लिहून राज्यात शिवसेना सरकार असल्याने शहराला संभाजीनगर नाव द्या अशी मागणी करत शिवसेनेच्या मर्मावर बोट ठेवलं आहे. पाणी योजनेवरून सर्वसाधारण सभेत गदारोळ केल्यावर आता संभाजीनगरचा मुद्दा घेऊन भाजप पुन्हा सभा गाजवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करा अशी मागणी केल्याचं भाजप गटनेता प्रमोद राठोड यांनी सांगितलं तर सेना भाजपला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.
Byte - प्रमोद राठोड - भाजप गटनेता
Byte - नासेर सिद्दीकी - एमआयएम नगरसेवक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.