ETV Bharat / state

भाजप आमदार सुरेश धसांचे बेताल वक्तव्य, भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना विरप्पनची उपमा

पाकिस्तानच्या तावडीतून परतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे कौतुक करताना सुरेश धस यांनी अभिनंदन यांना थेट विरप्पनची उपमा दिली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचे आणि खंबीर नेतृत्त्वाचे लक्षण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य धस यांनी केले.

भाजप आमदार सुरेश धसांचे बेताल वक्तव्य
author img

By

Published : Apr 11, 2019, 11:45 AM IST

औरंगाबाद - भाजप आमदार सुरेश धस यांनी बेताल वक्तव्य करत पातळी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या तावडीतून परतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे कौतुक करताना सुरेश धस यांनी अभिनंदन यांना थेट विरप्पनची उपमा दिली. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचे आणि खंबीर नेतृत्त्वाचे लक्षण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य धस यांनी केले.

भाजप आमदार सुरेश धसांचे बेताल वक्तव्य

औरंगाबादमध्ये आयोजित प्रचारसभेत सुरेश धस बोलत होते. विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचे आणि खंबीर नेतृत्त्वाचे लक्षण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी औरंगाबादमध्ये केले. त्यानंतर आपण विरप्पन आणि अभिनंदन यांची तुलना करत नसल्याचे सांगत धस यांनी सारवासारव केली. सर्जिकल स्ट्राईकही 20 मिनिटात झाले असल्याचे धस म्हणाले.

अमेरीकेने लादेनला काही क्षणात उचलून समुद्रात टाकला होते, असे म्हणत सुरेश धस यांनी सर्जिकल स्ट्राईकचे महत्व पटवून दिले. यापुढे सर्जिकल स्ट्राईक करत असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांना सोबत पाठवून देऊ म्हणजे ते बाँब टाकताना शूटिंग करतील. 'ते जर तिथे अडकले तर आणू की परत. विरप्पन सारखा दिसणारा अभिनंदन आणला ना 60 तासात' असे धस म्हणाले. काँग्रेसच्या लोकांना तिथे नाही सोडायचे, परत आणायचे भाषण करायला असेही सुरेश धस म्हणाले. अभिनंदनची विरप्पनशी तुलना केल्यानंतर धस यांना आपली चूक लक्षात आली. अभिनंदनची तुलना विरप्पनसोबत करणार नाही असेही धस म्हणाले.

Intro:भाजप आमदाराने प्रचारकरताना पातळी ओलांडल्याच पाहायला मिळालं. पाकिस्तानी विमान पडणाऱ्या वैमानिक अभिनंदन यांना चक्क चंदन तस्कर विरप्पनची उपमा दिली.
औरंगाबादमध्ये प्रचार सभेत बोलताना सुरेश धस यांनी बेताल वक्तव्य करत पातळी ओलांडल्याच पाहायला मिळालं. Body:पाकिस्तानच्या तावडीतून परतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं कौतुक करताना सुरेश धस यांनी बोलण्याच्या नादात अभिनंदन यांना थेट विरप्पनची उपमा दिली.Conclusion:विरप्पनसारखा अभिनंदन परतला, हे मोदींच्या धोरणाचं आणि खंबीर नेतृत्त्वाचं लक्षण असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी औरंगाबादमध्ये केलं. यानंतर आपण विरप्पन आणि अभिनंदन यांची तुलना करत नसल्याचं सांगत धस यांनी सारवासारव केली. बीड जिल्ह्यातील औरंगाबादेतस्थित मतदानासाठी आयोजित मेळाव्यात धस यांनी अजब वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलंय. सर्जिकल स्ट्राईक करताना 20 मिनिटात खेळ इकडतीकड झाला ते काय खूप आधी पासून तपासात नाही बसले. अमिरेकेने लादेनला पण काही क्षणात उचलून समुद्रात टाकला पण होता असं म्हणत सर्जिकल स्ट्राईकच महत्व पटवून दिल. यापुढे सर्जिकल स्ट्राईक करत असताना काँग्रेसच्या दोन नेत्यांना पण सोबत पाठवून देऊ म्हणजे ते बॉंब टाकताना शूटिंग करतील, आणि ते तिथे अडकले तर आणू की परत, विरप्पन सारखा दिसणारा अभिनंदन आणला ना 60 तासात. काँग्रेसच्या लोकांना तिथे नाही सोडायच परत आणायचं भाषण करायला अस देखील वक्तव्य सुरेश धस यांनी केलं. अभिनंदनला विरप्पनची तुलना केल्यानंतर धस यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी अभिनंदनची तुलना विरप्पनसोबत करणार नाही असं धस यांनी कार्यक्रमात सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.