औरंगाबाद - भाजप राष्ट्रीय महिला आयोगतर्फे वसुंधरा रक्षा अभियानाला औरंगाबाद येथून सुरूवात झाली. या अभियानाची सुरुवात महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात झाली. या अभियानांतर्गत पर्यावरणपूरक बॅग बँक सुरू करण्यात आली असून 'रिसायकल फॉर लाईफसायकल' या थीमवर कापडी पिशव्या देणारी ही बँक असणार आहे.
2 ऑक्टोबर पासून देशात सिंगल युज प्लास्टिक बंद करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप महिला मोर्चाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यावेळी, देशात आता कापडी पिशव्यांचे एटीएम सुरू करणार असल्याचे भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये गुरुवारी 60 उमेदवारांचे 80 अर्ज दाखल
सिंगल प्लास्टिकच्या वापराणे पर्यावरणाची हानी होत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प हाती घेतलाय. त्या संकल्पनेला जन आंदोलन बनवण्यासाठीची जबाबदारी ओळखून कापडी पिशव्या वापरण्याचे अभियान राबवण्यास औरंगाबाद येथून सुरुवात करण्यात आली. या अभियानात घरातल्या टाकाऊ कापड्यांपासून कापडी पिशव्या तयार केल्या जाणार आहेत. विशेषतः महिलांच्या टाकाऊ साड्यांपासून या पिशव्यांची निर्मीती करण्यात येणार आहे. यामध्ये महिला काही महिला टाकाऊ साड्या जमा करणार असून एक गट त्या कापड्यापासून पिशव्या तयार करणार आहे. यासाठी बचत गटाची मदत घेतली जाणार असून देशात ६५० जिल्ह्यांमध्ये हे अभियान सुरू करणार येणार आहे. त्यामुळे लवकरच कापडी विशव्यांचे एटीएम आपल्याला सर्व देशात पाहायला मिळेल अशी माहिती भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.
हेही वाचा - अब्दुल सत्तारांसाठी भाजपने सोडला हक्काचा मतदारसंघ !