सिल्लोड (औरंगाबाद) - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप केला. गृहमंत्री देशमुख यांच्या 100 कोटी हप्ता वसूलीच्या निषेधार्थ सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परीसर दणाणून सोडला. गृहमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आणखी आंदोलन तीव्र केल्या जाईल, असा ईशाराही भाजपच्या वतीने देण्यात आला आले. सिल्लोड येथे गृहमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
हेही वाचा - एमपीएससी परीक्षेला सुरुवात; लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : मतदानाला सुरुवात; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला