ETV Bharat / state

Bibi Ka Maqbara : बिबी का मकबऱ्याच्या गॅलरीचा भाग कोसळला! - सुदैवाने जीवितहानी नाही

बिबी का मकबऱ्याच्या मिनाराचा भाग कोसळल्याची घटना रविवारी (Bibi Ka Maqbara Pillar Part collapse ) घडली. पावसामुळे बाल्कनीला तडा गेला ( Cracked Pillar Balcony Due To Rain ) आणि त्यातून हा भाग कोसळला असून लवकरच त्याची दुरुस्ती होईल अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाने दिली आहे.

Bibi Ka Maqbara
बिबी का मकबरा
author img

By

Published : Nov 21, 2022, 9:29 AM IST

औरंगाबाद : मिनी ताज म्हणून ओळखला जाणाऱ्या बिबी का मकबऱ्याच्या मिनाराचा भाग कोसळल्याची घटना रविवारी ( Bibi Ka Maqbara Pillar Part collapse ) घडली. पावसामुळे बाल्कनीला तडा गेला ( Cracked Pillar Balcony Due To Rain ) आणि त्यातून हा भाग कोसळला आहे. लवकरच त्याची दुरुस्ती होईल अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाने दिली आहे.

पर्यटकांना जाण्यास मज्जाव : बाल्कनीचा भाग कोसळल्यावर पुरातत्व विभागाने पाहणी ( Archeology Department Will Repair ) केली. कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तर पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मकबऱ्याची देखभाल दुरुस्तीची काम केली जात होती. मात्र पावसामुळे काम थांबले होते. मात्र आता कोसळलेल्या भागासह इतर दुरुस्तीची काम केली जातील असे पुरातत्व विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

17 व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले : बीबी का मकबरा 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल सम्राट औरंगजेबने बांधला ( Aurangzeb built Bibi Ka Maqbara ) होता. इतिहासकारांच्या मते, ही समाधी मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा आझम शाह याने त्याची आई दिलरस बानो बेगम यांच्या स्मरणार्थ बांधली होती. त्यांना राबिया-उद-दौरानी या नावानेही ओळखले जात होते. ताजमहालच्या धर्तीवर ते बांधले गेले. हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहे. ही समाधी अकबर आणि शाहजहानच्या काळातील शाही बांधकामापासून शेवटच्या मुघलांच्या साध्या वास्तुकलेतील बदल दर्शवते. ताजमहालशी तुलना केल्यामुळे ते अधीक चर्चेत आले. मुघल काळात ही वास्तू औरंगाबाद शहराच्या मध्यभागी असायची. ज्यामध्ये औरंगजेबाची वास्तुकला दिसून येते.

बांधकाम : बीबी का मकबरा हा 1657-1661 इसवी सनाच्या मध्ययुगीन काळात बांधला गेला. असा अंदाज आहे. ही वास्तू एकूण 25 एकरात पसरलेली आहे. ज्यामध्ये मुख्य घुमट आणि चार मिनार 3094 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहेत. बीबी का मकबराचा घुमट पूर्णपणे संगमरवरी दगडाचा आहे. घुमटाशिवाय दुसरे बांधकाम प्लास्टरचे करण्यात आले आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी वापरलेले दगड जयपूरच्या खाणीतून आणले होते. आझमशहाला तो "ताजमहाल" पेक्षा अधिक भव्य बनवायचा होता. पण ते शक्य झाले नाही.या समाधीची रचना अतुल्ला यांनी केली होती. अतुल्ला यांचे वडील उस्ताद अहमद लाहोरी हे जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ चे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जात होते. या समाधीचा घुमट ताजमहालच्या घुमटापेक्षा आकाराने लहान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.