ETV Bharat / state

Guardian Minister Bhumre: पालकमंत्री भुमरेंनी रागाने खाली फेकली स्वागताची शाल; असं काय घडलं कार्यक्रमात? - पैठण भूमिपूजन कार्यक्रम

'महाराष्ट्र भूषण' कार्यक्रमात घडलेली दुर्घटना पाहता दुपारी 12 ते 5 या वेळेत कोणतेही शासकीय कार्यक्रम घेऊ नका, असे सरकारने ठरवले होते. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आज (शुक्रवारी) दुपारी 1 वाजता भर उन्हात विविध कामांचे भूमिपूजन कार्यक्रम पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत सुरू झाले. त्यावेळी योग्य उपाययोजना नसल्याने भुमरे व्यासपीठावर संतप्त झाले. स्वागतासाठी दिलेली शाल त्यांनी टाकून देत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Guardian Minister Bhumre
पालकमंत्री भुमरे
author img

By

Published : May 19, 2023, 4:56 PM IST

भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचा संताप

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): एकेकाळी राज्यात प्रसिद्ध असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान काही वर्षांपासून बंद आहे. उद्यानाची दुरुस्ती झाली नसल्याने सर्वसामान्यांसाठी ते बंद ठेवण्यात आले होते; मात्र आता हे उद्यान पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्यानाच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पैठण येथे घेण्यात आला; मात्र कार्यक्रमाला उशीर झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेला मंडप छोटा आणि खुर्च्या कमी असल्याने पालकमंत्री भुमरे हे चांगलेच संतप्त झाले. व्यासपीठावरूनच त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. त्यानंतर तातडीने खुर्च्या बोलवण्यात आल्या. दरम्यान भुमरे यांनी रागातच स्वागत स्वीकारले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग सर्वांना दिसून येत होता. रागामुळे भुमरे यांची चिडचिड होत होती. चिडचिडीत त्यांनी स्वागताची शालही खाली टाकून दिली.

उष्माघातामुळे दुपारचे कार्यक्रम नकोच: खारघर येथे तळपत्या उन्हात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती; मात्र नियोजनाअभावी 16 भाविक उष्माघाताचे बळी ठरले. त्यामुळे कार्यक्रमाला गालबोट लागले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने उन्हात कार्यक्रम घेऊ नका, अशा सूचना दिल्या होत्या. दुपारी 12 ते 5 या काळात कोणतेही जाहीर कार्यक्रम घेऊ नये, असे निर्देश सरकारतर्फे देण्यात आल्यानंतरही राज्यातील मंत्री ऐन उन्हात कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे.

उन्हात कार्यक्रम घेण्याची गरजच काय? मंडप टाकल्यानंतरही उष्णतेने उपस्थित नागरिक त्रस्त होतात. याचाच प्रत्यय पैठणमध्ये आला. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन वेळी भर दुपारी कार्यक्रम झाल्याने अनेकांना उन्हाचा तडाका सहन करावा लागला. त्यामुळे असे कार्यक्रम खरेच घेण्याची गरज आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

  1. Fine On Bageshwar Baba : बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबावर ठोठावला दंड, जाणून घ्या काय आहे कारण
  2. Mobile battery explosion: मोबाईल दुरूस्तीच्या दुकानात मोबाईल बॅटरीचा स्फोट; ग्राहकासह दुकानदार किरकोळ जखमी
  3. Chhatrapati Sambhajinagar Crime News: मुलीची हत्या करून दाम्पत्याने केली आत्महत्या; कारण मात्र अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.