औरंगाबाद - बँक खासगीकरणाविरोधात युनायटेड फोरम बँक युनियनतर्फे बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात राज्यातील 10 हजार शाखांमधील 50 हजारांहून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. हा संप सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असल्याच मत बँक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
आर्थिक मागणीसाठी नाही तर खातेदारांच्या हक्कासाठी संप
15 व 16 मार्च रोजी बँक कर्मचाऱ्यांनी पुकरलेला संप हा कुठल्याही आर्थिक मागणीसाठी नसून खातेदारांच्या ठेवीचे संरक्षण करण्यासाठी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना आयडीबीआय बँकेसह इतर दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयाला बँक कर्मचारी विरोध करत आहेत. सर्व सामान्यांची बचत धोक्यात येईल, त्यांना हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. याआधी येस बँक, बीएमसी बँक, ग्लोब ट्रस्ट बँख, कराड बँक या बँकांबंद केल्याचा अनुभव वाईट असल्याने ग्राहकांसाठी बंद पळाला जात असल्याची माहिती युनायटेड फोरम बँक युनियन संघटनेचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी दिली.
कोरोनामुळे नियमांचे पालन करत आंदोलन
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता संपाच्या काळात आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवणेयासाठी कोविडचे नियम पळून आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करत, मर्यादित कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बँक परिसरात हातात फलक घेऊन निर्दशने करण्यात आली. विविध भागांमध्ये आणि ग्राहकांना मागणीबाबत पत्रक वाटण्यात आले. शहरात आणि ग्रामीण भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी दिली.
हेही वाचा - जिल्हा बँक निवडणूक : बिगरशेती मतदारसंघाच्या पाच जागा ठरणार निर्णायक
हेही वाचा - साखर कारखाना खिश्यात घालण्यासाठी काही नेत्यांचा डाव, प्रशांत बंब यांचा आरोप