औरंगाबाद - श्री संस्थान गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिराला प्राचीन असा वारसा आहे. मूर्ती स्वयंभू आहे असे पूर्वज सांगतात. लोकमान्य टिळक हे शहरात आल्यानंतर संस्थान गणपतीच्या दर्शन घेतल्याशिवाय रहात नसे. दरम्यानच्या काळात टिळकांनी संस्थान त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा या गणपतीला शिवसेनेच्या विजयासाठी नवस केला होता. तो पूर्णही झाला. आजपर्यंत शिवसेनेची सत्ता महापालिकेवर राहिली आहे.
लोकमान्य टिळकांनीही केला होता नवस -
लोकमान्य टिळक औरंगाबादमध्ये एका खटल्याच्या निमित्तानं येत होते. यावेळी खटल्याच्या सुनावणी अगोदर टिळक संस्थान गपणपतीसमोर डोकं ठेवल्याशिवाय जात नसत. दरम्यान लोकमान्यांनी तो खटला जिंकला. त्यानंतर गणपतीची ख्याती गावोगावी अधिकच पसरत गेली.
बाळासाहेब ठाकरेंनी केला होता नवस -
औरंगाबाद महापालिकेची पहिली निवडणूक 1988 च्या काळात झाली. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सभेच्या निमित्ताने शहरात आले होते. त्यांनी या गणपतीची ख्याती ऐकली होती. भाषणाआधी त्यांनी आधी या ग्रामदेवतेचं राजाबजार येथे येऊन दर्शन घेतलं. यावेळी पहिल्या निवडणुकीत शिवसेनाच सत्तेवर यावी,अशी इच्छा संस्थान गणपतीच्या चरणी व्यक्त केली. इच्छा पूर्ण झालं तर तुला सोन्याचा सुवर्णमुकूट अर्पण करेल, असं नवस केला होता. यावेळी सेनेचा औरंगाबाद महापालिकेवर विजय झाला. दरम्यान 1989-90 साली बाळासाहेबांनी शिवसेनेचा महापौर आल्यानंतर क्रांतीचौक येथून सुवर्णमुकुटाची मिरवणूक काढत स्वहस्ते गणपतीला तो अर्पण केला. अनेक दिग्गज राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार, उद्योगपती, अधिकारी गणपतीच्या पायावर नतमस्तक होतात.
तब्बल 125 वर्षानंतर मूर्तीला वज्रलेप -
मूल काळ्या पाषाणाची शिवकालीन मूर्ती ही मूळची शिवकालीन मूर्ती. शहराच्या मध्यभागी असलेल्या या संस्थान गणपती सुमारे ३०० वर्षांपासून औरंगाबादकरांच्या श्रद्धेला जागणाऱ्या या मूर्तीवरील शेंदुर लेपनामुळे मूर्तीचा आकार बदलत गेला. यामुळे मूर्तीच मूळ रूप बदलत गेलं. यामुळे 125 वर्षानंतर या मूर्तीचं वज्रलेपन करण्यात आलं. मूर्तीला आधी मूळ पाषाणरुपात आणलं गेलं आणि त्यानंतर शेंदूर लावण्यात आला. त्यानंतर विधीवत प्रतिष्ठापना करून गणपतीचं मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं.
हेही वाचा - विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल