छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना, बीआरएस नेते कादीर मौलाना यांनी आम्ही औरंगजेबाला मानणार, त्याने एकेकाळी एकहाती देशात सत्ता गाजवली, जातीवाद केला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आदर्श मानणार असे विधान कादीर मौलाना यांनी केले. त्याच्या फोटो लावण्यावरून वाद कशाला? ते काही दाऊद होते का? सत्तेसाठी असणारी गोष्ट आहे, उद्या इतिहासात शरद पवार यांचे शत्रू अजित पवार होते असे म्हणणार का? असे विधान त्यांनी केले.
सर्व धर्मियांना न्याय दिला : औरंगजेब हे भारताचे सम्राट होते. त्यानी सर्व एक हाती सत्ता अनेक वर्ष सांभाळली. मात्र असे करत असताना त्यानी कधीही जातीवाद केला नाही. जिल्ह्यात निपट निरंजन येथील मंदिरासाठी जागा, किराडपुरा ज्या ठिकाणी दंगल झाली तिथे राम मंदिरासाठी जागा ही औरंगजेब यांनी दिली होती. काही इतिहास माहिती नाही आणि बोलतात. त्याच्या एका सरदाराने हिंदू महिलेसोबत चुकीचे कृत्य केल्यावर, त्या सरदाराला देखील हत्तीच्या पायाशी देऊन शिक्षा दिली होती. सत्तेची लढाई होती, ती तर आज देखील पाहायला मिळते. आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वाद आहेत. उद्या या दोघांना शत्रू म्हणणार का? असे विधान कदीर मौलाना यांनी व्यक्त केले.
औरंगजेब काय दाऊद होता का? : आज औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकारण केले जात आहे. मात्र यामुळे समाजात तेढ निर्माण केला जात आहे. औरंगजेबाने 50 - 52 वर्ष अखंड भारतावर एक हाती राज्य केले. असे करत असताना त्यानी प्रत्येक समाजाच्या लोकांना सामावून घेतले. अशा राजाचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला तर लगेच औरंगजेबाची अवलाद म्हणून त्यांना बोलले जाते. हिंदू बांधवांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, औरंगजेब डाकू, चोर, लुटेरा किंवा दाऊद नव्हते अशी टीका कादीर मौलाना यांनी केली. भाजपकडे असे अनेक मुद्दे आहेत, एक मुद्दा संपला की, त्याच्या पोटात आणखीन मुद्दे आहेत. ते पटापट बाहेर काढून भांडण लावायचे काम करतात. अशा परिस्थितीत फक्त बीआरएस पक्षच धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काम करतो. जो सर्व समाजाला घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे आम्ही या पक्षासोबत काम करतो असे ते म्हणाले.
जयंत पाटील यांच्यामुळे वाद : जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील शकुनी मामा असल्याचा आरोप कादीर मौलाना यांनी केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्या घरात भांडण लावण्याचे काम केले. इतकेच नाही तर पक्षातील अनेक नेत्यांमध्ये त्यांनीच भांडण लावली. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना बाजूला जावे लागले. त्यामुळे आज एक नगरसेवक निवडून आणण्याची देखील ताकद पक्षात राहिली नाही. ज्या लोकांची गरज नाही अशा लोकांनाच त्यांनी दिले असा आरोप देखील कादीर मौलाना यांनी केला आहे.
हेही वाचा -