ETV Bharat / state

औरंगाबादेत वाहतूक पोलिसांची दादागिरी; घरपोच पावती मागितल्याने तरुणाची गाडी जप्त, घटना कॅमेऱ्यात कैद

दंड भरा अथवा गाडी जमा करू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्यावर मी गाडी सोडणार नाही, असे तो तरूण म्हणाला. मात्र, त्याचे काहीही एकून न घेता पोलिसांनी त्याची दुचाकी ताब्यात घेतली. हा सर्व प्रकार या तरुणाने त्याच्या कॅमेरात कैद केला आहे.

औरंगाबाद पोलिसांची दादागिरी तरुणाने केली कॅमेऱ्यात कैद.
author img

By

Published : May 5, 2019, 8:00 PM IST

औरंगाबाद - येथील वाहतूक पोलिसांची दादागिरी एका तरुणाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. दंडाची रक्कम नसल्याने संबंधित तरुणाने ऑनलाईन घरपोच पावती मागितली. यामुळे संतापलेल्या वाहतूक पोलिसांनी मारहाण करीत या तरूणाची दुचाकी जप्त केली. हा सर्व प्रकार या तरुणाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. प्रेम रोहिदास घोडके, असे या तरूणाचे नाव आहे.

औरंगाबाद पोलिसांची दादागिरी तरुणाने केली कॅमेऱ्यात कैद.

दुचकीस्वारच वाहतूक पोलिसांचे खरे टार्गेट आहे, असे अलीकडच्या काळात दिसत आहेत. याचाच प्रत्यय आज आला. चिकलठाणा एमआयडीसी येथील रहिवासी असलेला प्रेम रोहिदास घोडके नावाचा तरुण त्याच्या MH20, EP7938 क्रमांकाच्या दुचाकीवरून कॅनॉट गार्डन परिसरातून प्रोझोन मॉलकडे जात होता. त्याने हेल्मेट घातले नसल्याने ३ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबविले. तो थांबल्यानंतर त्याला दंडाची रक्कम भरण्यासाठी सांगितली. मात्र, त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने पोलिसांना गाडीचा फोटो काढा आणि घरपोच सुविधा असलेली पावती पाठवा, अशी विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला.

दंड भरा अथवा गाडी जमा करू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्यावर मी गाडी सोडणार नाही, असे तो तरूण म्हणाला. मात्र, त्याचे काहीही एकून न घेता पोलिसांनी त्याची दुचाकी ताब्यात घेतली. हा सर्व प्रकार या तरुणाने त्याच्या कॅमेरात कैद केला आहे. या तरूणाने पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात सिडको ठाण्यात तक्रार दिली आहे. आता या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकारी किती दखल घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:औरंगाबादेत वाहतूक पोलिसांची दादागिरी एका तरुणाने कॅमेरात कैद केली आहे. दंडाची रक्कम नसल्याने तरुणाने ऑनलाइन घरपोच पावती मागितल्याने संतापलेल्या वाहतूक पोलिसांनी मारहाण करीत दुचाकी जप्त केली या घटनेमुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे अत्सुक्याचे ठरणारं आहे.
Body:औरंगाबाद शहरात भर रस्त्यावर वाहनाचा बाजार मांडला आहे. निम्म्याहून अधिक रस्ता वाहनांनी व्यापल्याने रस्त्यांना वाहनतळाच स्वरूप प्राप्त झाले आहे.वर्षनुवर्षं ही स्क्रॅप वाहने रस्त्यावर पडून आहेत. महावीर चौक ते चिकलठाणा या औरंगाबादच्या मुख्य रस्त्यावर रोज शेकडो मुजोर आप्पे रिक्षाचालक कशा पद्धतीने आणि किती नियमात राहून रिक्षा चालवित आहे हे सर्वश्रुत आहे मात्र वाहतूक विभाग या कडे दुर्लक्ष्य करीत आहे.आणि दुचकीस्वारच वाहतूक पोलिसांचे खरे टार्गेट आहे असे अलीकडच्या काळात दिसत आहेत. याचाच प्रत्यय आज आला चिकलठाणा एमआयडीसी येथील रहिवासी असलेला प्रेम रोहिदास घोडके नावाचा तरुण त्याच्या (mh20ep7938) या क्रमांकाच्या दुचाकीवरून कॅनॉट गार्डन परिसरातून प्रोझोन मॉल कडे जात असताना तेथील सिग्नलजवळ हेल्मेट घातले नसल्याने तीन वाहतूक पोलीस कर्मचार्यांनी त्यास थांबविले तोही थाम्बला मात्र त्या कडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने त्याने गाडीच्या क्रमांकाचा फोटो काढा व मला घरपोच सुविधा असलेली पावती पाठवा अशी विनंती केली मात्र पोलिसांनी त्यास नकार दिला. दंड भरा अन्यथा गाडी जमा करू असा पवित्रा पोलिसांनी घेतला त्यावर मी गाडी सोडणार नाही असे तरुण म्हणाला मात्र पोलिसांनी त्या तरुणाचे काही एक न ऐकता दुचाकी ताब्यात घेत त्या दुचाकीला विनाचावी खालून वायर काढत डायरेक्ट केली.व विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण केली हा सारा प्रकार तरुणाने मोबाईल कैद केला आहे. व मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचारी विरोधात सिडको ठण्यात तक्रार दिली.या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकारी किती दखल घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.