औरंगाबाद - जिल्ह्यात रविवारी सकाळी 28 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 276 झाली आहे. तर 583 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले असून मृतांची संख्या 48 वर पोहचली आहे.
शहरामध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये न्याय नगर, गारखेडा (2), टाऊन हॉल (1), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3), कैलास नगर (4), राम नगर, एन-2, सिडको (1), नारळीबाग (1), गौतम नगर, जालना रोड (1), संभाजी कॉलनी, सिडको (1), महेश नगर (1), जुना बाजार (1), एमजीएम परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), शंकुतला नगर, शहानूरवाडी (1), औरंगपुरा (2), आशियाद कॉलनी, बीड बायपास (1), वडगाव कोल्हाटी (2), अब्दाशहा नगर,सिल्लोड (1) या भागांतील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 13 महिला आणि 15 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
रुग्ण वाढत असले तरी कारोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने आतापर्यंत 583 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शनिवारी सात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये चार पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये बारी कॉलनीतील 70 वर्षीय पुरुष, सिटी चौकातील 65 वर्षीय पुरुष, रोशन गेट येथील 42 वर्षीय पुरुष, पंचकुवा येथील 35 वर्षीय महिला, जुना मोंढा येथील 25 वर्षीय महिला, सिल्लेखाना येथील 21 वर्षीय महिला आणि फुलशिवरा 76 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामुळे घाटीतून आतापर्यंत 47 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या घाटी रुग्णालयात 78 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 69 जणांची प्रकृती सामान्य असून नऊ जणांची गंभीर आहे.
तर जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये शनिवारी सहा कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये सातारा परिसरातील ७० वर्षीय महिला, संजयनगरातील ४० वर्षीय पुरूष, पुंडलिक नगरातील ३९ वर्षीय पुरूष, भवानी नगरातील आठ वर्षीय पुरूष आणि ४२ वर्षीय महिला, चिकलठाणा पुष्प गार्डन येथील ६५ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.
घाटीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथील ६१ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी सकाळी, किराडपुऱ्यातील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा २२ मे रोजी संध्याकाळी आणि सिटी चौकातील ७२ वर्षीय पुरूष रुग्णाचा पहाटे पाच वाजता मृत्यू झाला आहे. घाटीमध्ये आजपर्यंत ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. मनपा कार्यक्षेत्रांतर्गत आतापर्यंत खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.