ETV Bharat / state

शरद पवार यांच्यावरील कारवाईचा औरंगाबाद राष्ट्रवादीकडून निषेध

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने(ईडी) ने माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

author img

By

Published : Sep 25, 2019, 6:14 PM IST

शरद पवार यांच्यावरील कारवाईचा औरंगाबाद राष्ट्रवादीकडून निषेध

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार तसेच माजी उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर 'सक्तवसुली संचलनालया'ने (ईडी) मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. शिखर बँक घोटाळाप्रकरणी तब्बल २५ हजार कोटींचे कर्ज वाटल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील क्रांतीचौकात निदर्शने केली. माजी आमदार किशोर पाटील यांच्य नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार

भाजप सरकार निवडणुकीच्या काळात मुद्दाम चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः सरकार विरोधी रान उठवले आहे. सरकार विरोधात विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य माणूस शरद पवार आणि राष्ट्रवादीशी जोडला जात असल्याने भाजपला निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागणार असल्याच्या भीतीने साहेबांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनात केला.

शरद पवार यांच्यावरील गुन्हा मागे घेतला नाही तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देत बुधवारी औरंगाबाद बंदचे आवाहन केल्याचे राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.

हेही वाचा - काय आहे शिखर बँक घोटाळा?

Intro:शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या क्रांतीचौक भागात निदर्शने केली. निवडणुकीच्या काळात भाजप सरकार मुद्दाम अश्या चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप करत गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी दिला.

Body:विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः सरकार विरोधी रान उठवले आहे. सरकार विरोधात विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य माणूस शरद पवार आणि राष्ट्रवादीशी जोडला जात असल्याने भाजपला निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागणार असल्याच्या भीतीने साहेबांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी आंदोलनात केला. शरद पवार यांच्यावरील गुन्हा मागे घेतला नाही तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा देत गुरुवारी औरंगाबाद बंदच आवाहन केल्याचं राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
byte - किशोर पाटील - माजी आमदार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.