ETV Bharat / state

औरंगाबाद लोकसभा : शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला, अटीतटीच्या लढतीत इम्तियाज जलील विजयी - सुभाष झांबड

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिसेना नेते चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यात अटीतटी लढाई झाली. यात जलील विजयी झाले आणि शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला.

औरंगाबाद लोकसभा मदरासंघातील उमेदवार
author img

By

Published : May 23, 2019, 6:07 AM IST

Updated : May 23, 2019, 9:54 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्यातील एकूण आठ जागांपैकी सात जागा काबीज करण्यात भाजप-शिवसेना युतीला यश आले. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा औरंगाबाद मतदारसंघ राखण्यात युतीला अपयश आले आहे. येथे शिसेना नेते चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत जलील विजयी झाले आणि शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला. याथे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या जावयामुळेच खैरेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

येथे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील आघाडीवर होते. यामुळे मतमोजणी कक्षाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली होती. मात्र या जल्लोषाचे रुपांतर हुल्लडबाजी झाल्याची घटना घडली. हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हुसकावून लावले. यावेळी पोलिसांना लाठिचार्जदेखील करावा लागला.

आज सकाळी आठ वाजेपासूनच एमआयएमच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. जस-जसा फेऱ्यांचा निकाल लाऊडस्पीकरवर सांगितले जात होता, कार्यकते तस-तसा जल्लोष करत होते. औरंगाबाद मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. येथे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे विरुद्ध ३ आमदार, अशी लढाई पाहायला मिळाली.

  • महत्वाच्या घडामोडी -
  • 5.40 pm - औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे 2 हजार 220 मतांनी आघाडीवर
  • 5.40 pm - २० व्या फेरी अखेर एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील ९ हजार ५२४ मतांनी आघाडीवर. त्यांना आतापर्यंत एकूण ३ लाख २२ हजार ६९४ मते मिळाली आहेत. त्या खालोखाल चंद्रकांत खैरे यांना ३ लाख १३ हजार १७० मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • 4.56 pm - शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे २ लाख ७७ हजार ११ मतांसह दुसऱ्या स्थानावर, शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव २ लाख ८५ हजार ९३ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना ६५ हजार १४३ मते मिळाली आहेत.
  • 4.50 pm - १८ व्या फेरी अखेर एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील २ लाख ९५ हजार ८४९ मतांसह आघाडीवर.
  • 4.30 pm - मतमोजणी केंद्राबाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, ब्यारिकेट्स ओलांडून प्रतिबंधित क्षेत्रात येत केली हुल्लडबाजी. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप कारत हुल्लडबाज तारुणांना हुसकावले.
  • 01.30 pm - इम्तियाज जलील २४ हजार ३८० मतांसह आघाडीवर आहेत.
  • 01.00 pm - एआयएमआयएमचे इम्तियाज जलील आघाडीवर, मतमोजणी कक्षाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
  • 11. 14 am - शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव ४७ हजार २३२ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
  • 11.13 am - आतापर्यंत आलेल्या निकालानुसार एआयएमआयएमचे इम्तियाज जलील 48 हजार ५५ मतांसह आघाडीवर आहेत.
  • 9.05 am - इम्तियाज जलील आघाडीवर
  • 8.30 am - शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आघाडीवर
  • 8.00 am - मतमोजणीला सुरुवात

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या २० वर्षांपासून औरंगाबादेतून निर्विवाद निवडणूक जिंकत आले होते. मात्र, यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी निश्चितच परीक्षा घेणारी ठरली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड हे तीन जण निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून उतरले होते. त्यामुळे येथील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.