औरंगाबाद - राज्यभरात ग्रामपंचायत मतमोजणीला सुरवात झाली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात ५७९ ग्रामपंचायतींसाठी ९ लाख ४२ हजार ५३५ मतदारांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला होता. तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात नऊ तालुक्यांत तालुका पातळीवर मतमोजणीला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे.
औरंगाबाद जिह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरवात साधारणतः दुपारी एक वाजेपर्यंत निकाल लागतील, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामध्ये ३८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे उर्वरित ५७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. यामध्ये वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ९६, औरंगाबाद ७१, पैठण ७८, फुलंब्री ४९, सिल्लोड ७७, सोयगाव ३६, कन्नड ८०, खुलताबाद २५, गंगापूर ६७ ग्रामपंचायतींच समावेश होता. हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 80 टक्के विक्रमी मतदान
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक निकाल : जल्लोष केल्यास होणार कारवाई