कन्नड (औरंगाबाद) - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कन्नड कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. आंदोलन करत असताना भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई राजकीय हेतूने केलेली आहे. एका खासदाराला अशा पद्धतीने धक्काबुक्की होत असल्याने देशात कायदा-सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
हेही वाचा - लातुरात भाजप-काँग्रेस समोरासमोर; एकीकडे कृषी कायद्याला विरोध तर, दुसरीकडे समर्थन
हाथरस येथील पीडित मुलीच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की देखील झाली. या धक्काबुक्कीत राहुल गांधी खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अटक केली. ही कारवाई अयोग्य असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या गोष्टीचा सर्वांनीच निषेध करायला हवा. अशा पद्धतीची कुठलीच कारवाई काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशाराही माजी आमदार नामदेव पवार यांनी दिला आहे.
कन्नड तहसील कार्यालयासमोर कॉंग्रेसने लाक्षणिक उपोषण करत केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरीविरोधी कायदा व कामगारविरोधी कायदा रद्द करण्यासाठी लाक्षणिक संप काँग्रेसतर्फे पुकारण्यात आला होता. यावेळी माजी आमदार नामदेव पवार, तालुका अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, अनिल पाटील सोनवणे, अब्दुल वाहेद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - कोल्हापूर : खासगी हॉस्पिटल लूट करत असतील तर, तक्रार करा - सतेज पाटील