ETV Bharat / state

संवेदना शुन्य औरंगाबादकर ! जनतेने माणुसकी दाखवली असती तर सुमित वाचला असता

सुमितचे काका राकेश कवडे हे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या एका संस्थेसाठी काम करतात. पण, त्यांच्या स्वतःच्या पुतण्यालाच वेळेवर मदत मिळू शकली नाही. त्यामुळे ते दुःख व्यक्त करतात.

मृत सुमित कवडे
author img

By

Published : May 5, 2019, 10:26 AM IST

औरंगाबाद - लोकांनी माणुसकी दाखवली असती तर सुमितचा जीव वाचला असता, हे शब्द आहेत औरंगबादमध्ये अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुमित कवडे या तरुणाच्या आईचे. अपघात झाल्यानंतर सुमित एक तासापर्यंत रस्त्यावरील बघ्यांना मदतीची विनंती करत होता. पण, लोकांनी त्याला मदत न करता व्हिडिओ काढणे पसंद केले. लोकांनी आभासी जगात न रमता भावनेसारखी कृतीही करणे आवश्यक आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.

कुणीच मदत न केल्याने सुमीतच्या काकाने खंत व्यक्त केली

३० एप्रिलला सुमित कवडे आणि सचिन गाडेकर हे दोघे मित्र दौलताबादजवळ एका हॉटेलात जेवायला गेले होते. तेथून परत असताना त्यांच्या दुचाकील एका ट्रकने समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले, त्यावेळी जखमी सुमित रस्त्यावरील लोकांकडे मदतीसाठी याचना करत होता. मात्र, बघ्यांनी फक्त व्हिडिओ काढणे आणि फोटो काढणेच पसंद केले. कुणीही त्यांना मदत केली नाही.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कुटुंबातील सुमित-
अखेर काही वेळाने रुग्णवाहिका दाखल झाली आणि त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रुग्णालय प्रशासनाकडूनही योग्य मदत मिळाली नसल्याचे सुमितच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. तेथून खासगी रुग्णालयात जात असताना सुमितने प्राण सोडला. सुमितचे काका राकेश कवडे हे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या एका संस्थेसाठी काम करतात. पण, त्यांच्या स्वतःच्या पुतण्यालाच वेळेवर मदत मिळू शकली नाही. त्यामुळे ते दुःख व्यक्त करतात.

बदलत्या जीवनशैलीमुळे लोक आत्मकेंद्री होत आहेत. व्हिडिओ गेम्समुळे हिंसा पाहणे लोकांच्या सवयीचे झाले आहे. यामुळे रक्त, मारामारी या गोष्टींनी आता संवेदना जागृत होत नाहीीत. त्यामुळे मदत करण्याची वृत्ती हरपत चालल्याचे मानसोपचार तज्ज्ञ अपर्णा अष्टपुत्रे यांनी सांगितले. यानंतर तरी लोकांनी वेळेवर कृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:माणसांमधील माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न औऱंगाबादेतील एका घटनेनं उपस्थित झालाय. अपघातानंतर तब्बल युवक जखमी अवस्थेत मदतीसाठी विनवणी करत होता, मात्र बघ्यांनी फक्त फोटो काढण्यात आणि व्हिडीओ करण्यातचं दंग होती, वेळेवर मदत मिळाली नसल्याने मुलाचा दुदैवी मृत्यू झाला. माणुसकली काळीमा फासणारी ही घटना औरंगाबादेत 30 एप्रिलला घडली या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सत्यता समोर आली.
Body:रुग्णालयात देखील वेळेवर उपचार मिळाले नाहीत त्यामुळे देखील सुमित वाचू शकला नाही असा आरोप नातेवाईकांनी केलाय. Conclusion:औरंगाबादच्या दौलतावाद परिसरात माणुसकी शिल्लक राहिली का असा प्रश्न विचारणारी घटना घडली. सुमित कवडे, हा तरूण मुलानं एका अपघाता स्वतचा जीव गमावला, 30 एप्रिलला दौलताबादजवळ एका ह़ॉटेलात तो मित्रासोबत जेवायला गेला होता, परतत असतांना त्याच्या गाडीला एका ट्रकनं धडक दिली त्यात सुमित आणि त्याचा मित्र सचिन गंभीर जखमी झाले, सुमित जखमी असतांनाही मदतीसाठी लोकांची विनवणी करत होता, मात्र लोकांनी मदत तर केली नाही, उलट तिथं लोक जखमीचे फोटो काढत होते आणि व्हिडीओ करत होते, जखमी अवस्थेतही सुमीतची मदतीसाठी विनवणी सुरुच होती, त्या व्हिडीओमध्ये सुद्धा ते स्पष्ट दिसतंय, मात्र कुणालाच पाझर फुटला नाही, अखेर तब्बल तासाभरानंतर रुग्णवाहिका आणि पोलिस पोहोचले आणि त्यांनी जखमीला सरकारी रुग्णालयाल पोहोचवले, लोकांनी वेळीच मदत केली असती तर माझ्या पोराचा जिव वाचला असता अशी भावना सुमितची आईने व्यक्त करत अपघात झाल्यावर आता तरी मदत करा अशी विनवणी केली.

बाईट...सुनिता कवडे,सुमितची आई

व्हिओ2.. सरकारी दवाखाण्यातही सुमितवर योग्य उपचार झाला नसल्याची खंत त्याच्या काकांनी व्यक्त केली, अखेर तिथून खाजगी दवाखाण्यात जात असतांनाच सुमितनं प्राण सोडला, सुमितचे काका ,स्वत अपघातग्रस्तांना मदत करणा-या एका संस्थेसाठी काम करतात, मात्र त्यांच्याच घरच्या मुलाला या वाईट प्रसंगाला सामोर जाव लागल्याची खंत त्यांना आहे..

बाईट..राकेश कवडे, सुमितचा काका

व्हिओ3.. लोक आत्मकेंद्रीत होताय, असले अपघात रक्त पाहण्याची सवय लोकांना झालीये आणि त्यातून मदत करण्याती वृत्ती हरपत चालल्याचं मानसोपचार तज्ञ यांचं मत आहे.

बाईट.. अपर्णा अष्टपुत्रे, मानसोपचारतज्ञ, विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

व्हिओ4.. सुमित सोबत असलेला त्याचामित्र सचिनही गंभीर जखमी आहे, त्याचीही मृत्यूसोबत झुंज सुरु आहे, सचिनचं नुकतच लग्न झालं आहे, त्याच्या कुटूंबियांवर दुखाचा पहाड कोसळला आहे, या दोघांनाही वेळीच मदत मिळाली असती तर आज चित्र वेगळं असतं, मात्र माणुसकीच हरवेल्याने एका आईला आपला मुलगा गमवावा लागलाय. या घटनेनंतर तरी नागरिक काही धडा घेतील का हा प्रश्न आहे.
(सकाळी दिलेला व्हिडिओ आणि फोटो वापरावा)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.