छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : यंदाचा रक्षाबंधन सोहळा काहीसा वेगळा मानला जात आहे. कारण या दिवशी मात्र राखी बांधण्यासाठी काही बंधन असल्याची माहिती ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी दिली. रक्षाबंधन साजरा करण्यासाठी 30 ऑगस्टला सायंकाळी 05:30 ते 6:30 आणि रात्री 09:02 मिनिटानंतर योग्य वेळ असल्याची माहिती अनंत पांडव यांनी दिली आहे. (Rakshabandhan 2023 Muhurat) (Raksha Bandhan 2023 Muhurat) (Rakhi Muhurat 2023)(Raksha Bandhan 2023)
रक्षाबंधनसाठी वेळ : 30 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असल्याकारणानं रक्षाबंधनाला विशिष्ट वेळ शास्त्रानं निर्देशित केली. शुक्ल पक्षातील चतुर्थी अष्टमी एकादशी किंवा पौर्णिमा या काळामध्ये भद्रा असल्यास किंवा कृष्ण पक्षातील तृतीया दशमी, सप्तमी आणि चतुर्दशीला भद्रा असल्यास हा काळ गृहप्रवेश, विवाह, रक्षाबंधन करण्यासाठी शास्त्राने निषिद्ध मानला आहे.
या काळामध्ये रक्षाबंधन करू नये : भद्राचा वास तीन ठिकाणी असतो. मृत्यू लोक आणि पाताल लोक विशिष्ट राशीमध्ये भद्रा निवास करत असल्यास, त्या त्या लोकांमध्ये भद्रेचा वास असतो असे समजले जाते. 30 ऑगस्ट रोजी कुंभ राशीमध्ये भद्रेचा वास असल्याकारणाने पृथ्वीवरती भद्रा वास असणार आहे. 30 ऑगस्ट 2023 ला 10 वाजून 59 मिनिटानंतर पौर्णिमा आरंभ होते. पण त्याच दिवशी सकाळी दहा वाजून 59 मिनिट ते नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत भद्रा असल्याकारणाने, या काळामध्ये रक्षाबंधन करू नये असे शास्त्रामध्ये उल्लेख आहे.
या काळामध्ये शुभ कार्य करावे : भद्राची पुच्छ संध्याकाळी 5.30 ते 6.31 पर्यंत आणि भद्रा मुख संध्याकाळी 6.31 ते 8.11 पर्यंत असेल. भद्राची पुच्छ शुभ असल्या कारणाने यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करू शकतात. तिथीच्या उत्तरार्धात होणारी भद्रा जर दिवसा असेल आणि कुठल्याही पूर्वार्धात होणारी भद्रा जर रात्री असेल तर शुभ मानली जाते. रक्षाबंधन शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:30 ते 6:30 रात्री 09:02 मिनिटानंतर असल्याचे सांगण्यात आले.
अशी आहे कथा : पौराणिक कथा भद्रा ही शनी महाराजांची बहीण आहे. शनि महाराजांप्रमाणेच भद्राही उग्र स्वभावाची आहे. भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की, जो तुझ्या भ्रमणकालामध्ये कुठलीही शुभ कार्य करेल त्याला यश मिळणार नाही. पुरणातील उल्लेखानुसार दशानन म्हणजेच रावणाने त्याच्या बहिणीकडून भद्रा या मुहूर्तावरती रक्षाबंधन केल्यामुळे पुढील वर्षभरात त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागले. असे कुठल्याही प्रकारचे कष्ट आपल्या भावाला भोगावे लागू नयेत. या कारणाने शुभमुहूर्तावरच रक्षाबंधन करावे असे आवाहन, वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडव गुरुजी यांनी केले आहे.
हेही वाचा -