औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय येथे सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शषाद्री गौडा (वय 30), असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते शहरातील बेगमपुरा भागात वास्तव्यास होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी औषधे आणि इंजेक्शन घेऊन आपले जीवन संपवले.
हेही वाचा - छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; अद्याप कोणालाही अटक नाही
शषाद्री यांच्या घराची झडती घेत असताना पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात 'मी आतापर्यंत जितकी प्रगती करायला हवी होती तितकी करू शकलो नाही. त्यामुळे, मागील 15 दिवसांपासून माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. मी मानसिक तणावामुळे आत्महत्या करत आहे' असा उल्लेख केलेला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.