औरंगाबाद : भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहे. सर्वत्र 'आझादी का अमृत महोत्सव' (AZADI KA AMRIT MAHOTSAV) साजरा केला जातोय. याचाच एक भाग म्हणून कधीही स्वप्नात विमानात बसण्याचा विचार न करणाऱ्या घटकाला हवाई सफर घडवण्यात आली. फ्लायबिग या विमान सेवा कंपनीने ही अनोखी सफर घडवून आणली. दिव्यांग मुले, गतिमंद मुले, वृद्धाश्रमातील वृद्ध, आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले खेळाडू, सुरक्षा रक्षक, कोविड योद्धे अशा 70 जणांना विमान सफर घडवण्यात (70 peoples dream of flying in the sky came true) आली.
70 जणांना घडवली हवाई सफर : देशाचा 'अमृत महोत्सव' आपण साजरा करत आहोत. यावेळी सर्वांना आनंद मिळावा; यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिक दुर्बल घटकाला विमान सफर घडवण्यात आली. रोज अवकाशात उडणारे विमान अनेक जण पाहतात. त्यामध्ये बसून आपणही अवकाश सफर करावी अस अनेकांना वाटते. मात्र आर्थिक स्थिती किंवा अन्य काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे अशा घटकांना विमान सफर घडवण्यासाठी, अनोखा उपक्रम 'फ्लायबिग विमान सेवा' कंपणीच्या माध्यमातून राबविण्यात आला. दिव्यांग मुले, गतिमंद मुले, वृद्धाश्रमातील वृद्ध, आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले खेळाडू, सुरक्षा रक्षक, कोविड योद्धे अशा 70 जणांना विमान सफर घडवण्यात आली.
प्रवासाबाबत देण्यात आली माहिती : स्वप्नामध्ये तरी विमान प्रवास करु, अशी अपेक्षा देखील करू न शकणाऱ्या 70 जणांनी ही हवाई सफर केली. हा अनुभव घेताना फक्त विमानात बसून सैर करणे असे नव्हते. तर विमानतळ येथे गेल्यावर होणारी तपासणी, तिकीट कसे असते, सुरक्षा रक्षक कसे काम करतात, आत जातांना किती प्रक्रिया करावी लागते. त्याचबरोबर वैमानिक यांच्याशी संवाद साधून विमान आणि प्रवास याबाबत माहिती देण्यात आली. आत जात असतांना हवाईसुंदरी यांनी त्यांना साहाय्य केले. एखाद्या चित्रपटात पाहिले, असे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले.
हवेत गेल्यावर केला जल्लोष : 70 प्रवासी घेऊन फ्लाय बिगचे विमान अवकाशात झेपावले. त्यावेळी सर्वांनीच 'भारत माता की जय' असा जयघोष केला. स्वप्नातही विचार केला नाही, असा प्रवास सुरु झाला. जे आकाश आपण जमिनीवरून पाहतो, जी ढग आपण अनुभवतो, त्याच ढगांच्या वरून-खाली जमीन पाहतांना, विमानातील प्रत्येक जण भारावून गेला होता. यात वृद्धाश्रमात राहणारे चार आजी -आजोबा, असे होते की, ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांनी आधार सोडला. ते सुध्दा अवकाशात वेगळा अनुभव घेत होते. तर दिव्यांग, गतिमंद मुले यांना वेगळा अनुभव घेता आला. स्वच्छता काम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षकाचे काम करणारे सुरक्षा रक्षक यांनी केलेला प्रवास त्यांना वेगळा अनुभव आणि आनंद देऊन गेला.
हेही वाचा :Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांनी केला एक कॉल; उद्योजकाचं असं बदललं नशीब