सिल्लोड : सिल्लोडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संदिपान घुमरे या मंत्र्यांचा ताफा ( Farmers blocked Abdul Sattar convoy ) अडवला. सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आज सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालक मंत्री संदिपान घुमरे या मंत्र्यांचा ताफा अडवला.
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी : जोरदार घोषणाबाजी करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावे व शेतकऱ्याच्या विविध मागण्या मान्य कराव्या अशी मागणी ( Farmers various demands to Abdul Sattar) केली. सरकारने लक्ष दिले नाही तर तीव्र संघर्षाला सामोरा जावे (Farmers slogans against government ) लागेल. असा खणखणीत इशारा औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे यांनी सदर मंत्र्यांना दिला.
स्वाभिमानीने दिला पलकमंत्री, कृषिमंत्रींना दम : आज पालकमंत्री यांचा अमसरी दौरा असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोळेगाव येथे ताफा अडवून पालक मंत्री व कृषी मंत्री यांना विविध मागण्याचे निवेदन दिले या निवेदनात शेतकऱ्यांना दिवसा 8तास वीज देण्यात यावी त्यांनाही इतरांप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी नुसते जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू ( Farmers various demands to Abdul Sattar )नका.
कासव गतीने काम : औरंगाबाद जळगांव रोडचे जे कासव गतीने काम चालू ते तात्काळ करण्यात यावा. निवेदन देतेवेळेस झालेल्या चर्चेत जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे यांनी सांगितले कि आता निवेदन देण्याचा खेळ आता संपुष्टात आला असून आता सन्माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी पुकारलेल्या उसदर आंदोलनाचा तोडगा न निघाल्यास आणि सन्माननीय साहेबांनी आदेश दिल्यास लढाई समोरासमोरची असणार आहे. असा दम जिल्हाध्यक्ष यांनी कृषिमंत्री यांना दिला.