ETV Bharat / state

औरंगाबादेत अ. भा. मराठी साहित्य महामंडळाची बैठक संपन्न - Aurangabad News Update

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात रविवारी पार पडली. या बैठकीमध्ये साहित्य संमेलन स्थळ निवड समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

औरंगाबादेत अ. भा. मराठी साहित्य महामंडळाची बैठक संपन्न

author img

By

Published : Jan 3, 2021, 5:40 PM IST

औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात रविवारी पार पडली. या बैठकीमध्ये साहित्य संमेलन स्थळ निवड समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान या साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची बैठक येत्या 8 जानेवारीला औरंगाबादमध्ये होणार असून, या बैठकीनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन कुठे होईल हे ठरवण्यात येणार आहे.

या बैठकीमध्ये महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुखे यांनी २०१९ - २० चा अंकेक्षित अहवाल सादर केला. तसेच २०२० - २१ च्या आर्थिक नियोजनाला मान्यता देण्यात आली. महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कपूर वासनिक यांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान अक्षरयात्रा संपादक मंडळासही मान्यता देण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील होते. बैठकीला प्रा. उषा तांबे( मुंबई ), उज्ज्वला मेहेंदळे( मुंबई ), प्रा. प्रतिभा सराफ ( मुंबई ), प्रा.मिलिंद जोशी( पुणे ), प्रकाश पायगुडे ( पुणे ), सुनिताराजे पवार ( पुणे ), विलास मानेकर ( नागपूर ), प्रदीप दाते ( वर्धा ), गजानन नारे ( नागपूर ), उपाध्यक्ष कपूर वासनिक( छत्तीसगड ) यांची उपस्थिती होती.

औरंगाबादेत अ. भा. मराठी साहित्य महामंडळाची बैठक संपन्न

साहित्य संमेलन स्थळ निवड समिती

औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुखे, प्रा.प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.