ETV Bharat / state

अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाच्या कामात 'एजंटगिरी'चा सुळसुळाट - बनावट पावती

अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाच्या कामात एजंटगिरीचा सुळसुळाट वाढला असून अधिकारीही एजंटांना पाठिशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे.

अन्न व नागरी पुरवठा कार्यालय
अन्न व नागरी पुरवठा कार्यालय
author img

By

Published : Dec 26, 2019, 10:27 PM IST

Updated : Dec 26, 2019, 11:49 PM IST

औरंगाबाद - अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना दरवर्षी आपल्याकडील वजन काटे व वजन मापन साहित्यांचे निरीक्षण करून घ्यावे लागते. त्यानंतर नियमाप्रमाणे फी भरून ते प्रमाणित करून घ्यावे लागते. पण, अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून नेमून दिलेले एजंट नियमापेक्षा जास्त पैसे घेऊन लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची लूट करत असल्याचे औरंगाबादच्या पैठण येथे उघडकीस आले आहे.

एजंटाचा व्हिडिओ

पैठण येथील ग्रनी चौकात असलेल्या सानिया किराणा जनरल स्टोअरमध्ये दोन एजंट आले. त्यानंतर त्यांनी आम्ही अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून आलो आहोत, असे म्हणत वजन मापाचे निरीक्षण सुरू केले. त्यानंतर त्यांच्याकडून 1 हजार 450 रुपये घेत त्यांना बनाबट पावती दिली. पण, नियमाप्रमाणे 450 रुपये होतात हे त्या दुकानदाराला माहीत होते. त्यामुळे त्याने पावती मागत मोबाईलवर व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आणि जाब विचारला. त्यानंतर त्या एजंटला व्हिडिओ करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने बनावट पावती घेऊन पैसे परत देत तेथून पळ काढला.

याबाबत अन्न व नागरी पुरवठा कार्यालय, पैठणच्या प्रभारी अधिकारी मुंडे यांना संपर्क साधून विचारले असता त्यांनी सांगितले, आम्ही काही एजंट नेमून दिले असून सरकारी मानांकित शुल्क व्यतिरिक्त एजंट जास्त पैसे घेत नाहीत. जर जास्त पैसे घेतले तर हा विषय व्यापारी आणि त्या एजंट पुरते मर्यादित आहे, यात आम्ही हस्तक्षेप करत नाही. यावरून अधिकारी आणि एजंट हे मिळून मलई खात नाहीत ना?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - सीएएच्या समर्थनार्थ नागरिकांचा औरंगाबादेत मोर्चा

Intro:अन्न व नागरी पुरवठा कार्यालय,
निरीक्षक वैद्यमापन शास्त्र पैठण, यांच्या एजंट आणि कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून ्यापार्‍याची फसवणूक उघडकीस, चित्रीकरण चालू असल्याचे लक्षात येताच पैसे ठेवून पळ काढले ।Body:छोट्या व मोठ्या व्यापाऱ्यांना दरवर्षी आपल्याकडे असणारे वजन माप, काटा ह्या साहित्यांचे निरीक्षण करून
अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते, नियमाप्रमाणे याची फी भरावी लागते मात्र अन्न व नागरी पुरवठा कार्यालय, निरीक्षक वैद्यमापन शाखा पैठण, त्यांनी नेमून दिलेल्या एजंट मनमानी पैसे व्यापाऱ्यांकडून उकळत असल्याची तक्रार व्यापारी बरेच दिवसापासून करत होते ।

आज सकाळी पैठण येथील ग्रीन चौक भागात सानिया किराणा जनरल स्टोअर ह्या स्टोअरवर आम्ही अन्न व नागरी पुरवठा कार्यालय तर्फे आलो असून तुमच्या वजन माप निरीक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगत त्या दोन जणांनी त्यांच्याकडून साडे चौदाशे रुपये घेतले । नियमाप्रमाणे साडेचारशे रुपये देणे गरजेचे असल्याचे दुकानदाराला माहित होते । दुकानदाराने दुसऱ्या क्षणी आपल्या मोबाईल वरुन या दोघांची चित्रीकरण सुरू केले आणि जाब विचारला, याबाबत जाब विचारताच आणि आपण व्हिडिओ शूटिंग मध्ये हे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघांनी डुप्लिकेट पावती परत घेतली आणि दुकानदार चे पैसे परत देऊन या ठिकाणाहून पळ काढला ।
Conclusion:याबाबत अन्न व नागरी पुरवठा कार्यालय, पैठण च्या प्रभारी अधिकारी मुंडे यांना संपर्क साधून विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्ही काही एजंट नेमून दिले असून सरकारी मानांकित शुल्क व्यतिरिक्त एजंट नाही जास्त पैसे घेतले तर हा विषय व्यापारी आणि त्या एजंट पुरते मर्यादित आहे यात आम्ही हस्तक्षेप करत नाही ।

एजंट वर अंकुश नसलेल्या या कार्यालयाची बाब व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी किती गंभीर आहे यावर चिंतन करण्याची गरज आहे ।
Last Updated : Dec 26, 2019, 11:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.