ETV Bharat / state

Nathashthi Ceremony at Paithan : पैठणमध्ये दोन वर्षानंतर भाविकांचा नाथषष्ठी  सोहळा रंगला

यावर्षी पैठणला नाथषष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. भक्तांच्या आणि मंदिर विश्वस्ताच्या मागणी नुसार सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी येणाऱ्या भक्तांना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. (Nathashthi Ceremony at Paithan) दरम्यान, नाथषष्ठी निमित्त (20 ते 25)मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पैठणमध्ये दोन वर्षानंतर भाविकांचा नाथष्ष्ठी सोहळा रंगला

author img

By

Published : Mar 22, 2022, 7:10 AM IST

Updated : Mar 22, 2022, 7:29 AM IST

औरंगाबाद (पैठण) - कोरोना माहामारीचा काळ सरल्यानंतर आता दोन वर्षानंतर पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळा मोठया उत्साहात होत आहे. भक्तांच्या आणि मंदिर विश्वस्ताच्या मागणी नुसार सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी येणाऱ्या भक्तांना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. (Nathashthi Ceremony at Paithan 2022) दरम्यान, नाथषष्ठी निमित्त (20 ते 25)मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 20 व्हॅक्सीनेटर एकाच वेळी लस देऊ शकतील, अशी यंत्रणा आरोग्य विभागाने तयार करण्यात आली आहे. याशिवाय 10 व्हॅक्सीनेटर अधिक असतील, याचीही व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण माहिती देताना

असा असतो सोहळा

श्रीखंड्याच्या रुपात साक्षात पांडुरंगाने एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरले होते. त्यामुळे तुकाराम बीज मुहूर्तावर पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वाडा मंदिरातील कृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पाणी भरलेल्या नाथांच्या रांजणाची विधिवत पूजा व आरती रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी केली. ( Nathashthi ceremony of in Paithan) यानंतर भाविकांनी गोदावरीतून पाणी आणून भरण्यास सुरुवात करुन नाथषष्टी उत्सव यात्रा सोहळ्याला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. नाथषष्टी सोहळ्याच्या निमित्ताने तुकाराम बीजेला नाथांच्या वाड्यातील रांजण भरण्याची प्राचीन परंपरा आहे.

हजारो भाविक येतात दर्शनाला, लसीकरण अनिवार्य

राज्यातून लाखो भाविक पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात. यामध्ये जवळपास 600 दिंडी दाखल होतात. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह कोरोना लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडी प्रमुख आणि भाविकांना केली आहे. त्याचबरोबर शासनाने सांगितलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नाथ षष्ठी सोहळ्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

सर्व यंत्रणांच्या प्रमुखांची उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार डी.बी. निलावाड, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, नाथ वंशज रघुनाथबुवा गोसावी, योगेश गोसावी, मधुसुदन रंगनाथबुवा, छैय्या महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी, विनित गोसावी, श्रेयस गोसावी, नगर पालिका मुख्याधिकारी संतोष आगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सु. सो. शेळके, डॉ. पी. एम. कुलकर्णी आदींसह सर्व यंत्रणांचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी २८ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

Last Updated : Mar 22, 2022, 7:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.