ETV Bharat / state

प्रचारसभा झाल्यावर ओवेसी यांनी केले नृत्य

सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सुरू आहे. प्रचार करताना मतदारांमध्ये उत्साह भरण्यासाठी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी चक्क पतंग उडवण्याची नक्कल करत व्यासपीठावरच नृत्य केल्याचं समोर आले.

author img

By

Published : Oct 19, 2019, 3:40 PM IST

असदुद्दीन ओवेसी व अन्य

औरंगाबाद - सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सुरू आहे. प्रचार करताना मतदारांमध्ये उत्साह भरण्यासाठी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी चक्क पतंग उडवण्याची नक्कल करत व्यासपीठावरच नृत्य केल्याचं समोर आले. आपल्या उमेदवारांना घेऊन त्यांनी केलेले नृत्य समाज माध्यमांवर चांगलेच लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ओवेसींचा पतंग डान्स

एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी गेली दोन दिवस औरंगाबादेत तळ ठोकून आहेत. प्रचार रॅली आणि प्रचार सभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. या सभांमध्ये एमआयएमच निवडणूक चिन्ह असलेला पतंग मतदारांना लक्षात रहावे यासाठी ओवेसी यांनी सभा संपल्यावर व्यासपीठावरच पतंग उडवण्याची नक्कल करत आपल्या शैलीत नृत्य केले. अवघ्या 20 ते 30 सेकंद केलेला हा डान्स सर्वांच्या लक्षात राहील असा ठरला.

हेही वाचा - भारतरत्न द्यायचेच असेल तर सुखदेव, भगतसिंग, अश्फाक उल्ला खान यांना द्या - ओवेसी

गेली 2 दिवस एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी औरंगाबादच्या विविध भागांमध्ये प्रचार फेऱ्या काढत घराघरात पोहोचत आहेत. आपली निशाणी पतंग सर्वांना लक्षात रहावी म्हणून आपल्या रॅलीत पतंग घेऊन काही कार्यकर्ते असतात. मात्र, प्रचार सभेमध्ये सभा पार पडल्यावर मतदारांमध्ये विशेषतः युवकांमध्ये उत्साह यावा आणि आपली पतंग निशाणी लक्षात रहावी म्हणून ओवेसी गेल्या दोन सभांमध्ये पतंग उडवण्याची नक्कल करताना दिसून आले. इतकंच नाही तर आपल्या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पतंग उडवण्याचा केलेला नृत्य समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसत.

हेही वाचा - मराठी अस्मिता बरोबरच विकास साधणे ही गरजेचे - खासदार जलील

Intro:सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सुरू आहे. प्रचारकरत असताना मतदारांमध्ये उत्साह भरण्यासाठी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असोउद्दीन ओवेसी यांनी चक्क पंतन उडवण्याची नक्कल करत व्यसपीठावरच डान्स केल्याचं समोर आलं. आपल्या उमेदवारांना घेऊन त्यांनी केलेला डान्स समाज माध्यमांवर चांगलच लोकप्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.Body:एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी गेली दोन दिवस औरंगाबादेत तळ ठोकून आहेत. प्रचार रॅली आणि प्रचार सभांच मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं. या सभांमध्ये एमआयएमच निवडणूक चिन्ह असलेला पतंग मतदारांना लक्षात रहाव यासाठी ओवेसी यांनी सभा संपल्यावर व्यासपीठावरच पतंग उडवण्याची नक्कल करत आपल्या शैलीत नृत्य केलं. अवघ्या 20 ते 30 सेकंद केलेला हा डान्स सर्वांच्या लक्षात राहील असा ठरला. Conclusion:गेली दोन दिवस एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असोउद्दीन ओवेसी औरंगाबादच्या विविध भागांमध्ये प्रचार फेऱ्या काढत घराघरात पोहचत आहेत. आपली निशाणी पतंग सर्वाना लक्षात रहावी म्हणून आपल्या रॅलीत पतंग घेऊन काही कार्यकर्ते असतात. मात्र प्रचार सभेमध्ये सभा पार पडल्यावर मतदारांमध्ये विशेषतः युवकांमध्ये उत्साह यावा आणि आपली पतंग निशाणी लक्षात रहावी म्हणून ओवेसी गेल्या दोन सभांमध्ये पतंग उडवण्याची नक्कल करताना दिसून आले. इतकंच नाही तर आपल्या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पतंग उडवण्याचा केलेला डांस समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.