ETV Bharat / state

SSC Exam : आईच्या निधनानंतर जड अंतकरणाने मुलाने दिली दहावीची परीक्षा

author img

By

Published : Mar 15, 2022, 4:49 PM IST

सरस्वती भुवन शाळेत दहावीच्या वर्गात असणाऱ्या अक्षद दुरडकर याची आई विद्या दुरडकर यांचे 13 मार्चला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऐन दहावीच्या परीक्षेचा पेपर सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच अक्षदवर दुःखाचे मोठे डोंगर कोसळला. आई विद्या या जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागात कार्यरत होत्या. आपल्या मुलाने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने अक्षद हताश हा झाला. मात्र, शिक्षक आणि दोन मावश्या यांनी धीर दिल्याने अक्षद परीक्षेला पोहोचला व त्याने परिक्षा ( Boy Give SSC Exam ) दिली.

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद - दहावीची परीक्षा आयुष्यायला महत्वाचा टप्पा मनाला जातो. मात्र, ऐन परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वीच अक्षद दुरडकर या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे आईचे मायेचे छत्र हिरावले गेले. परीक्षेच्या दिवशी आईचा तिसरा दिवस असताना विधिवत पूजन करून अक्षद परीक्षेला पोहचला ( Boy Give SSC Exam ) व परीक्षा दिली. त्याला पाहून इतर विद्यार्थ्यांनाही धीर मिळाला.

विद्यार्थ्याशी बातचित करताना प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वीच झाले आईचे निधन - सरस्वती भुवन शाळेत दहावीच्या वर्गात असणाऱ्या अक्षद दुरडकर याची आई विद्या दुरडकर यांचे 13 मार्चला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऐन दहावीच्या परीक्षेचा पेपर सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच अक्षदवर दुःखाचे मोठे डोंगर कोसळला. आई विद्या या जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागात कार्यरत होत्या. आपल्या मुलाने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने अक्षद हताश हा झाला. मात्र, शिक्षक आणि दोन मावश्या यांनी धीर दिल्याने अक्षद परीक्षेला पोहोचला.

शिक्षकांचा आधार ठरला मोलाचा - अक्षदच्या आईचे निधन झाल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. कोरोनामुळे वडिलांचा रोजगार गेला. घरी आठ वर्षाची लहान बहीण त्यात आई गेल्याने तो पूर्ण खचला होता. तो रडला देखील नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. त्याच्या मावशीने त्याला सोमवारी (दि. 14 मार्च) शाळेत आणले. त्याच्या शिक्षकांनी समजूत काढली. त्यानंतर तो खूप रडला आणि त्याने त्याच्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. मावशी आणि शिक्षकांनी त्याला आधार देत परीक्षा देण्यात धीर दिला. त्याने सोमवारी रात्री परीक्षेचा अभ्यास केला. मंगळवारी आईच्या तिसऱ्या दिवसाचा विधी करून तो सकाळी वेळेवर परीक्षेला पोहोचला. परीक्षा केंद्रावर शिक्षकांनी आणि मित्रांनी त्याला आधार देत धीर दिला. त्यानंतर अक्षदने दहावीचा पेपर लिहायला सुरुवात केली.

हेही वाचा - Hijab Controversy Verdict : हिजाब बंदीमुळे मुस्लीम मुली शिक्षणापासून दूर जातील - खा. इम्तियाज जलील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.