ETV Bharat / state

Schools Reopen Aurangabad : दीड वर्षांनी सुरू झाली प्राथमिक शाळा, विविध उपक्रम राबवत केले विद्यार्थ्यांचे स्वागत - औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरु

जिल्ह्यात ग्रामीण भागात शाळा ( Schools Reopen in Aurangabad Rural ) सुरू करण्यात आली आहे. दीड वर्षानंतर विद्यार्थी शाळेत असल्याने शाळेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. काही ठिकाणी रांगोळ्या काढून तर काही ठिकाणी फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पिसादेवी येथील टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल ( Talent International School ) येथे विद्यार्थ्यांचे स्वागत टीव्हीत असणाऱ्या कार्टून्सने केले. त्यामुळे शाळेतील पहिला दिवस अविस्मरणीय असा ठरला.

कार्टून्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत

author img

By

Published : Dec 1, 2021, 7:10 PM IST

Updated : Dec 1, 2021, 7:21 PM IST

औरंगाबाद - राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात शाळा ( School Reopen in Aurangabad Rural ) सुरू करण्यात आली आहे. दीड वर्षानंतर विद्यार्थी शाळेत असल्याने शाळेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. काही ठिकाणी रांगोळ्या काढून तर काही ठिकाणी फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पिसादेवी येथील टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल ( Talent International School ) येथे विद्यार्थ्यांचे स्वागत टीव्हीत असणाऱ्या कार्टून्सने केले. त्यामुळे शाळेतील पहिला दिवस अविस्मरणीय असा ठरला.

ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना

ग्रामीण भागातील शाळा झाल्या सुरू

राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून सर्व शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कोविड नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये सोशल डिस्टंसिंग, मास्क वापर असे निर्बंध हे लावण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांमध्ये तयारी करण्यात आली आहे. या आधी ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने प्राथमिक शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अटीशर्तींसह उत्साहात शाळा सुरू करण्यात आल्या. पालकांनी आनंद व्यक्त करत आता गरज असली तरच शाळा बंद ठेवा, अशी विनंती केली आहे.

शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले कार्टून्स

पिसादेवी भागातील टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल तर्फे विद्यार्थ्यांचा विषय स्वागत करण्यात आले. शाळेच्या समोर रंगीबिरंगी फुग्यांची कमान उभी करण्यात आली होती. आवारात जाताच टीव्हीवर रोज येणारे आवडते कार्टून्स स्वागतासाठी उभे होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेतला पहिला दिवस अविस्मरणीय केला. त्याचबरोबर शिक्षकांनी हातात सॅनिटायझर घेऊन हातचे निर्जंतुकीकरण केले. त्यानंतर थर्मलगण आणि ऑक्सिमीटरद्वारे शरीर तापमान तपासणी करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. वर्गात जात असताना वर्गशिक्षकेनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थी आनंदाने शाळेत आले. शाळेचा पहिला दिवस त्यांना कायम लक्षात राहावा आणि आनंद देणारा असावा, याकरिता हा प्रयत्न केल्याचे मुख्याध्यापिका वैशाली गोरे यांनी सांगितले.

शहरात शाळा राहिल्या बंद

कोरोनाचा नवीन व्हायरस येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच महानगरपालिकेच्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन शाळांना उघडण्याचा निर्णय घेतला. पुढील दहा दिवसात पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मनपा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. 5 डिसेंबर रोजी पुढील बैठक घेऊन 10 डिसेंबर नंतरच शाळा उघडणे शक्य होईल, अशी माहिती मनपा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - Schools reopen in Nandurbar: शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची 90 टक्के उपस्थिती

Last Updated : Dec 1, 2021, 7:21 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.