छत्रपती संभाजीनगर (गंगापूर) : Aditya Thackeray: मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी (Aditya Thackeray Visit Farmer) करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
खोक्याचे आणि धोक्याचे सरकार : मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhajinagar Rain ) पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटून शेती पिके करपू लागली. शेतकऱ्यांना गरज असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करते मात्र शेतकऱ्यांची नाही, हे सरकार खोक्याचे आणि धोक्याचे आहे, सरकारचं मन एवढं काळं झालं आहे की, त्यांना शेतकऱ्यांच्या संवेदना दिसत नाही. अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर (Aditya Thackeray Criticized On Shinde Fadnavis Government) केली.
शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसांना प्रत्युत्तर देणार : मराठवाड्यात यंदा दुष्काळ सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत पावसाचा एक महिन्याहून अधिक काळाचा खंड पडला आहे. पिकं हातातून गेली आहे. या भागात आदित्य ठाकरे यांनी पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यथा जाणून घेतल्या. गंगापुर तालुक्यातील गुरु धानोरा व मुद्देश वाडगाव येथे आदित्य ठाकरे यांनी पावसाची परिस्थिती, पिकांची स्थिती याची माहिती जाणून घेतली. शेती पिकं शेतकऱ्यांच्या हातातून गेली असताना बँकांची सक्तीची कर्ज वसुली सुरू असून बँका शेतकऱ्यांना नोटीसा बजावत आहेत. कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्याच्या अनुदानाला होल्ड लावत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या : बँका शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers suicides) वाढल्या आहेत. कृषिमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नका, जीवाचं बरे वाईट करण्याचा विचार मनातही आणू नका. ठाकरेंची शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितलं.
महिला शेतकऱ्यांनी शेतातील भेंड्या दिल्या भेट : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी गंगापूर तालुक्यातील गुरु धानोरा येथील कपाशीच्या शेतात जाऊन शेतकरी महिलांशी संवाद साधत महिला शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या. पाऊस नसल्याने पिकाची वाढ खुंटली, विहीर, बोरवेल कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं गाऱ्हाणं महिला शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडलं. यावेळी महिला शेतकऱ्यांनी शेतात पिकलेल्या भेंड्या आदित्य ठाकरे यांना भेट दिल्या.
पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती : यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,(Ambadas Danve) माजी खासदार चंद्रकांत खैरे,(Chandrakant Khaire) आमदार उदयसिंह राजपूत, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, लक्ष्मण सांगळे, माजी बांधकाम सभापती अविनाश गलांडे, तालुका प्रमुख दिनेश मुथा, उपतालुका प्रमुख सुभाष कानडे, आबासाहेब शिरसाठ, भाग्येश गंगवाल, विजय पानकडे शेतकरी, शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
हेही वाचा -