औरंगाबाद - माझे आजोबाही विचार करतील या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होणार आहे अशी, टीका युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हयातील रांजणगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन झाले.यावेळी ते बोलत होते. राज्य ओके नाही, पण हे ओके होऊन बसले. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे गेले असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
गद्दाराच्या हाताने अनावरण - उद्या शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण विधिमंडळात केले जाणार आहे. या प्रकारावर देखील आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण झाले असे माझे आजोबा म्हणतील. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचे अनावरण होणार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.
मुख्यमंत्री कुठेही सुरु करतात कॅसेट - कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात, तुम्ही असं काय खाल्लं होतं जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावं लागले असा, सवाल त्यांनी उपस्थित केला. तर रांजणगाव येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इथे जर घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असते तर, त्यांनी आपली कॅसेट सुरू केली असती. ते कुठेही जातात तिथे उदाहरणे देतात. दहीहंडीला गेलं तर सहा महिन्यापूर्वी आम्ही थर रचला असं म्हणतात, इथे आले असते तर, सहा महिन्यापूर्वी आम्ही षटकार ठोकला अशी टेप त्यांनी सुरू केली असती अशी, टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
उद्योगात टोळी घुसली - ही टोळी उद्योगात घुसल्यानंतर आपले काही खरे नाही म्हणून उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. शिवाय दावास येथे जाऊन यांनी राज्यात बोगस कंपन्या आणल्या, त्याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन यांचा भांडाफोड करणार असल्याच देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शिवशक्ती, भीमशक्तीची गरज - शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात असलेली परिस्थिती पाहता सर्व समाजांना घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकार वर टीका केली. संजय राऊत काल तिथे जाऊन आले, काश्मिरी पंडित यांनी काही मागण्या केलेल्या आहेत. आजही त्यांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, ती अद्याप मंजूर होत नाही असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा - MLA Shivendra Raje : छत्रपती संभाजी महाराजांची धर्मरक्षक म्हणून इतिहासात ओळख, आमदार शिवेंद्रराजे यांचा दावा