ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, कुटुंबीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठेवला मृतदेह

बाबासाहेब वीर या मेंढपाळाचा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंधारात कामासाठी खोदलेला खड्डा न दिसल्याने बाबासाहेब खड्ड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बाबासाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

बाबासाहेब वीर
author img

By

Published : May 29, 2019, 2:35 PM IST

औरंगाबाद - बाबासाहेब वीर या मेंढपाळाचा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नेला. अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी बाबासाहेब यांचा मृतदेह मूळगावी परत नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील लांची गावाजवळ पुलाचे काम सुरू होते. मात्र त्या ठिकाणी चेतावणी देणारा कुठलाही फलक लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अंधारात कामासाठी खोदलेला खड्डा न दिसल्याने बाबासाहेब खड्ड्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बाबासाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शहरातील घाटी रुग्णालयात बाबासाहेब यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

खड्ड्यात पडून मेंढपाळाचा मृत्यू

Intro:रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याने एका मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेत समोर आली. बाबासाहेब वीर अस या मेंढपाळाचं नाव असून रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचा मागणीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नेला होता. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाईच आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी बाबासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला.Body:बाबासाहेब वीर हे मेंढीपालन करत होते. लांची गावाजवळ पुलाच काम सुरू होत मात्र तिथे चेतावणी देणारी कुठलीही खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे अंधारात कामासाठी खोदलेला खड्डा न दिसल्याने बाबासाहेब खड्ड्यात पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.Conclusion:पुलाच काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे बाबासाहेबांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर कुटुंबीयांनी मृतदेह सार्वजनिक बांधकाम विभागात नेऊन ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. कारवाई होईपर्यंत बाबासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिल्याने कुटुंबीयांनी बाबासाहेब वीर यांचा मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.