छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - नशेच्या आहारी गेलेल्या पित्याने आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकल्याची याची धक्कादाय घटना चिकलठाणा परिसरात घडली. स्थानिक युवकाला हा प्रकार करतात त्याने, विहिरीत उडी मारून एका मुलाला वाचवले. मात्र एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. पत्नीबरोबर यातील मुलांच्या बापाचे भांडण होत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पित्याने मुलांना ढकलले - चौधरी कॉलनीत येथे राजू प्रकाश भोसले या व्यक्तीने रात्री 8 वाजता स्वतःच्या आठ वर्षीय शंभू आणि चार वर्षीय श्रेयस या 2 मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली. यावेळी जवळ राहणाऱ्या अनिरुद्ध दहीहंडे या युवकाने आवाज ऐकून विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी नराधम पित्याने त्याला आपण मुलांना विहिरीत टाकल्याचे सांगितले. अनिरुद्ध याने कुठलाही विचार न करता विहिरीत उडी टाकली आणि मोठा मुलगा शंभू याला सुखरूप बाहेर काढले. मात्र लहान आलेल्या श्रेयसला वाचवण्यात त्याला यश मिळाले नाही. एमआयडीसी सिडको पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी राजू प्रकाश भोसले याला अटक केली. तसेच पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
नशेची सवय असल्याने कौटुंबिक वाद - राजू प्रकाश भोसले हा 35 वर्षीय इसम नशेच्या आहारी गेलेला असल्याने त्याच्या घरात अनेक वाद होतात. त्यातूनच काही महिन्यांपूर्वी त्याच्याशी भांडण करून त्याची पत्नी नांदेड येथे आपल्या माहेरी निघून गेली आहे. आरोपी राजु मागील आठवड्यात आपल्या मुलांना घेऊन शहरात आला अशी प्राथमिक माहिती समोर आली. आपल्या मुलांना विहिरीत ढकलत असताना देखील त्याने नशेच्या गोळ्या घेतलेल्या होत्या अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली. या प्रकरणी राजू भोसले याने हे कृत्य का केले? याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Gram Sevak abducted : पाच लाख दे नाहीतर खेळ खल्लास, ग्रामसेवकाचे सिनेस्टाईलने अपहरण