औरंगाबाद- कोरोनाचे रुग्ण वाढत असून संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मात्र, उपचार घेणाऱ्या रुग्णांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत संजयनगर येथील एका कोरोना पॉझिटिव्ह युवकाने त्यांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी सुविधांचा अभाव असून पिण्याचे पाणी देखील मिळत नसल्याचा आरोप केला आहे.
युवकाने तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेत असताना एकाच गाडीत कोंबून नेत असल्याचे म्हटले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे कुटुंबीय आणि शेजारी यांना वेगवेगळ्या रुग्णालयात नेले पाहिजे, मात्र त्यांना सोबत नेले जाते. त्यामुळे, संसर्ग होण्याची भीती जास्त वाटली. तपासणी झाल्यावर पॉझिटिव्ह रुग्णांचे कुटुंबीय मुक्तपणे वावरत होते, सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी झाली होती, असे अनुभव युवकाने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवलेल्या ठिकाणी नाष्ता, जेवण यांची सोय नाही, इतकेच काय तर पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नसल्याचा आरोप कोरोनाबाधित युवकाने केला आहे. त्यामुळे, कोरोनाच्या काळात प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा- Coronavirus : औरंगाबादमध्ये 3 दिवस कडकडीत बंद, कोरोनाबाधितांचा आकडा 177 वर